Gujrat Crime Saam Tv
क्राईम

Gujrat Crime: संतापजनक! बलात्काराच्या आरोपानंतर कोठडी, जामिनावर बाहेर येताच ७० वर्षीय पीडितेवर आरोपीकडून पुन्हा अत्याचार

Gujrat Crime: गुजरातमधील भरूचमध्ये एका ७० वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. बलात्काराच्या गुन्हात दोषी असलेल्या आरोपीने पीडितेला पुन्हा शिकार बनवलं.

Bharat Jadhav

गुजरातमधील भरूचला हादरवून सोडणारी घटना घडलीय. एका ७० वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडलीय. बलात्काराच्या आरोपातून तुरुंगात गेलेल्या आरोपीने जामिनावर बाहेर येताच पीडितेवर पु्न्हा बलात्कार केल्याची घटना भरूचमध्ये घडलीय. बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी आढळल्यानंतर या नराधमाला कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातील त्याला जामीन मिळाला.

तुरुंगातून बाहेर येताच त्याने पुन्हा त्याच पीडितेवर अत्याचार केला. शैलेश राठोड असं या आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने १५ डिसेंबर आणि २२ डिसेंबरला एका शेतातील झोपडीत राहणाऱ्या एका वृद्ध महिलेला आपल्या वासनेचा शिकार बनवलं. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शैलेशने या आधीही या ७० वर्षीय महिलेवर अत्याचार केले होते.

याच अत्याचाराच्या आरोपानंतर त्याला कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र त्याला न्यायालयाने जामीन दिला. जामीन घेऊन बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा त्याच पीडितेवर अत्याचार केलेत. नराधमाने अत्याचार केल्यानंतर महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली होती. जर घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर परिणाम वाईट होतील अशी धमकी नराधमाने पीडितेला दिली होती.

दरम्यान पीडितेने घडलेल्या घटनेनंतर पोलिसात तक्रार दिलीय. महिलेने तक्रार नोंदवल्यानंतर अमोड पोलिसांनी दुसऱ्या अत्याचाराची गुन्हा नोंदवलाय. महिलेवर अत्याचार केल्यानंतर आरोपी फरार झालाय. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी गुन्हे शाखा आणि स्पेशल ऑपरेशन पथके तयार केली आहेत.

18 महिन्यांपूर्वी झाली होती अटक

या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला १८ महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती.

या वर्षाच्या सुरुवातीला त्यांची जामिनावर सुटका झाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. या प्रकरणाने संपूर्ण भरुच हादरलंय. गुजरातमधील भरूच हे क्रुरतेच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे चर्चेत आहे. याआधी १० वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार करून तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घुसवल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर अवघ्या काही दिवसांतच मुलीचा मृत्यू झाला.

भरुचमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचारात मुलीला गंभीर दुखापत झाली होती. प्राथमिक उपचारानंतर तिला भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर येथील सिव्हिल हॉस्पिटलमधून वडोदरा येथील एसएसजी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. तेथे या पीडितेचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास मुलीला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तिची प्रकृती खालावली. उपचारानंतर रुग्णाची प्रकृती स्थिर झाली, मात्र सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तिला दुसरा हृदयविकाराचा झटका आला. त्यात तिचा मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death: अजित पवारांचा घातपात झाला, रोहित पवारांच्या संशयावर सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...

Sweet Corn Soup : हॉटेल सारखे स्वीट कॉर्न सूप बनवा आता घरच्या घरी, लगेच नोट करा रेसिपी

Maharashtra Live News Update: पुणे सातारा महामार्गावर किकवी गावाच्या हद्दीत खाजगी लक्झरी बसचा अपघात

Marriage Life Tips: लग्नानंतर नवरा- बायकोचं नातं कसं असावं?

Actor Death: प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, मनोरंजन विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT