acb arrests worker from ulhasnagar municipal corporation in bribe case saam tv
क्राईम

Ulhasnagar Crime News : दोन हजाराची लाच घेतल्याप्रकरणी उल्हासनगर महापालिकेच्या मुकादमास अटक

हिललाईन पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

अजय दुधाणे

Ulhasnagar News : 

उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रभाग मुकादम संजय पेडामकर यांना दोन हजाराची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पेडामकर यास अटक केल्याची माहिती हिललाईन पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे. (Maharashtra News)

याबाबत मिळालेली माहिती अशी - कॅम्प क्रमांक पाच भागात रोडवर शोरमा विक्री करणाऱ्या विक्रेत्यास रस्त्यावर व्यवसाय करायचा असेल तर दर महिन्याला तीन हजार रुपये लाच द्यावी लागेल अन्यथा इथे व्यवसाय करायला देणार नाही असा सज्जड दम संजय यांनी दिला हाेता.

संबंधित विक्रेत्याने ठाणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. दरम्यानच्या काळात विक्रेत्याने संजय यास दोन हजार रुपयांची लाच देण्याची तडजोड केली. हे पैसे स्वीकारण्यास संजय पेडामकर आल्यानंतर तसेच त्याने लाच स्वीकारल्यावर सापळा रचून बसलेल्या लाचलुचपत अधिकाऱ्यांनी त्यास रंगेहाथ पकडले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संजय पेडामकर यास अटक केल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Rule: तुमची कंपनी PF खात्यात कमी रक्कम जमा करतेय का? अशा प्रकारे एका क्लिकवर तपासा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे स्व. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी दाखल

Urmila Matondkar: मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरचा दिवाळी स्पेशल ग्लॅमर्स लूक, पाहा खास PHOTO

फलटणच्या डॉक्टर महिलेला कोण प्रेशराइज करत होतं; साम टीव्हीच्या हाती लागलेल्या त्या पत्रात खळबळजनक माहिती

...तर फलटणच्या डॉक्टर महिलेचा जीव वाचू शकला असता

SCROLL FOR NEXT