aarvi police arrests four in sand theft case saam tv
क्राईम

Wardha Crime News: नायब तहसीलदारांच्या पथकावर वाळू चाेरट्यांचा हल्ला, आर्वीत चौघांना अटक

मध्यरात्री नांदपूर घाटावर पथकावर झाला हाेता हल्ला.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Wardha News :

वर्धा जिल्ह्यात वाळू चोरट्यांनी चक्क नायब तहसीलदारांच्या पथकावर हल्ला केल्याची धक्कादयक घटना घडली. या पथकातील सदस्यांचा मोबाइल हिसकावून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तलाठी सूरज चव्हाण यांनी पाेलिसांत तक्रार नाेंदवली. आर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल करत चाैघांना अटक केली आहे. (Maharashtra News)

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी : आर्वी तालुक्याच्या नांदपूर वाळू घाटातून अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे नायब तहसीलदार देवीदास सोरते, तलाठी सूरज चव्हाण हे कर्मचा-यांसह मध्यरात्री नांदपूर घाटावर गेले.

घाटावर काही जण अवैधरीत्या वाळूउपसा करीत असल्याचे नायब तहसीलदार सोरते व त्यांच्या पथकाच्या निदर्शनास आले. त्यांना पथकाने रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वाळू चोरट्यांनी अश्लील शिवीगाळ करीत पथकातील सदस्यांना मारहाण केली. त्यांच्या जवळील मोबाईल हिसकावून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रकरणाची तक्रार तलाठी सूरज चव्हाण यांनी आर्वी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी चाैघांवर गुन्हा दाखल केला. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार या प्रकरणी संदेश गलाट, समीर घोडे यांच्यासह त्यांच्या दोन सहका-यांना अटक करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात रुळावर पडला, लोकलखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: दरोड्यासाठी घुसलेल्या चोरट्यांकडून वृद्धाची निर्घृण हत्या

पठ्याने चक्क पेट्रोलसाठी आणली 500 लिटरची टाकी, पाहा VIDEO

Sunil Pal: मुंबईत प्रसिद्ध कॉमेडियनचा अपमान; मंचावर बोलावून सत्कार केला, नंतर माईक हिसकावून खाली पाठवलं, VIDEO व्हायरल

Morning Diet Mistakes: सकाळी रिकाम्या पोटी हे पदार्थ खाणं टाळा

SCROLL FOR NEXT