Crime News Saam tv
क्राईम

Crime News: संतापजनक! गोव्यात ५ वर्षीय चिमुकलीची लैंगिक अत्याचार करुन हत्या; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात

Goa Crime News: आई वडिलांसोबत पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या एका ५ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची संतापजनक घटना दक्षिण गोव्यात घडली.

Satish Daud

Goa Latest Crime News

आई वडिलांसोबत पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या एका ५ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची संतापजनक घटना दक्षिण गोव्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून १५ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. (Breaking Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत चिमुकलीचे आई-वडील पश्चिम बंगालमधील रहिवासी आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी ते काही दिवसांपूर्वी गोवा येथे आले होते. दक्षिण गोव्यातील वास्को येथील एका बांधकाम साईटवर ते मजूर म्हणून काम करीत होते.  (Latest Marathi News)

शुक्रवारी (ता. १२) रात्री उशिरापर्यंत साईटवर काम सुरु असल्याने चिमुकलीचे वडील बांधकाम साईटवरच होते. त्यांनी चिमुकलीला जवळच असलेल्या घरामध्ये जाण्यास सांगितले. वडिलांच्या आदेशानंतर चिमुकली आपल्या घराकडे निघून गेली. जेव्हा चिमुकलीचे वडील काम आटोपून घरी आले, तेव्हा त्यांना मुलगी कुठेही दिसून आली नाही.

याबाबत त्यांनी पत्नीकडे विचारणा केली असता, चिमुकली घरी आलीच नसल्याचं पत्नीने सांगितले. यानंतर आई-वडिलांनी चिमुकलीची शोधाशोध घेतली असता, तिचा थागपत्ता लागला नाही. पहाटे ३ वाजेच्या सुमारास बांधकाम साईटवरील एका इमारतीजवळ ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.

तिच्या मानेवर तसेच पाठीवर गंभीर जखमा होत्या. याशिवाय चिमुकलीच्या अंगावर कपडे देखील नव्हते. आई-वडिलांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, असता डॉक्टरांनी चिमुकलीला मृत घोषित केले. तिचे शवविच्छेदन केले असता, चिमुकलीवर अत्याचार झाल्याचं उघड झालं.

दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत १५ संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Running vs Walking Benefits: 30 मिनिटे धावणं की 1 तास चालणं? फिट राहण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

Summer Yoga Tips: उन्हाळ्यात योगा करताना या चुका करू नका, नाहीतर होईल मोठा त्रास

SCROLL FOR NEXT