Gujrat Crime  Saam Tv
क्राईम

Gujrat Crime : ५५ वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचार; घरकाम देण्याचा बहाण्याने बोलवलं घरी अन्..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

55 Year Old Woman Physical Abused In Badoda:

गुजरातमधील बडोदामध्ये एका ५५ वर्षीय महिलेवर अत्याचाराची घटना घडलीय. घरकाम शोधणाऱ्या महिलेवर तीन नराधमांनी अत्याचार केल्याची घटना बडोदा येथे घडलीय. याप्रकरणाने पोलिसांनी तीन आरोपींनी अटक केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, एका रिक्षावाल्याने या महिलेचा मोबाईल नंबर दिला त्यानंतर महिलेला कॉल करत तिला घरी बोलवलं आणि निर्जनस्थळी नेत अत्याचार केला. (Latest News)

पोलिसांनी वकील पठाण, शकील अहमद पठाण आणि चमन पठाण अशी अटक केलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. रिक्षाचालकाने महिलेला कामाच्या बहाण्याने बोलावून निर्जनस्थळी नेले. त्याचे दोन मित्र तिथे आधीच उभे होते. तिघांनीही तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती या प्रकरणी एम.पी. भोजनी डीसीपी म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माणुसकीला काळिमा फासणारी घटना शुक्रवारी घडली. तीन लोकांनी पीडिता महिलेला घरकाम देण्याच्या बहाण्याने घरी बोलवलं आणि तिच्यावर अत्याचार केला. या महिलेने तिच्यासोबत घडलेली घटना तिच्या मुलीला सांगितली. त्यानंतर मुलीने याप्रकरणाची तक्रार पोलिसात दिली. माध्यामांना मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता घर कामाच्या शोधात होती. कुठे घरकाम मिळाले का याची विचारणा मिळेल का, अशी माहिती ती लोकांना विचारत होती. त्यावेळी एका रिक्षाचालकाने तिला कामा देण्यासाठी तिचा मोबाईल नंबर घेतला.

या रिक्षाचालकाचं नाव वकील पठाण असून त्याने मोबाईल नंबर घेतल्यानंतर त्याने पीडिता महिलेला अर्धा तासात कॉल केला. एका बंगल्यात घरकाम मिळून शकते असं त्याने सांगितले. कॉल आल्याप्रमाणे ही महिला आली. रिक्षावाल्याने महिलेला निर्जनस्थळी नेलं. तेथे रिशावाल्याचे दोन मित्र शकील अहमद पठाण और चमन पठाण आधीच उपस्थित होते. त्यानंतर महिलेला रिक्षावाल्याचा संशय आला. तिने त्यांचा विरोध केला.

्यावेळी त्याने त्या महिलेला ओढत ओढत निर्जनस्थळी नेलं. त्यानंतर या तिघांनी त्या महिलेवर सामुहिक अत्याचार केला. यानंतर महिलेने आपल्या मुलीला तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर महिलेच्या मुलीने पोलिसात तक्रार दिलीय. तक्रारीवरून एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी तात्काळ चार पथके तयार करून आरोपींना अटकेसाठी तपास कार्य सुरू केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Saraf: महाराष्ट्राच्या महानायकाची पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री

Marathi News Live Updates : सायबर हेल्पलाईनच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी वाचवले १ कोटी रुपये

Arabian Sea Shiv Smarak : अरबी समुद्रात शिवस्मारकाचा संभाजीराजेंकडून शोध, जलपूजन झालेलं शिवस्मारक गेलं कुठं?

Bigg Boss Marathi Grand Finale: कोकण हार्टेड गर्ल बिग बॉसच्या घरातून बाहेर, प्रेक्षकांचे मानले आभार..

Chhagan Bhujbal : अजित पवार गटाचे बडे नेते पवार गटात जाणार; छगन भुजबळ यांनी सांगितलं विधानसभेचं नेमकं गणित

SCROLL FOR NEXT