Suicide Case in Pandharpur Saam Tv
क्राईम

Crime News : चौदा वर्षाच्या मुलाची आत्महत्या, वडिलांच्या रिव्हॉल्व्हरने स्वत:च्या डोक्यात घातली गोळी

Suicide Case : पंढरपूरच्या आढेगावमध्ये थरारक प्रकार घडला आहे. एका १४ वर्षीय मुलाने वडिलांच्या रिव्हॉल्व्हरने स्वत:ला गोळी मारुन आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्या का केली यामागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

Yash Shirke

भरत नागणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Suicide Case : पंढरपूरच्या माढ्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माढा तालुक्यातील आढेगाव या गावात १४ वर्षीय मुलाने रिव्हॉल्व्हरने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. मृत मुलाचे वडील सशस्त्र सीमा बलामध्ये कामाला आहेत. वडिलांचे रिव्हॉल्व्हर चालवून मुलाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव श्रीधर गणेश नष्टे असे आहे. त्याचे वडील गणेश सदाशिव नष्टे हे सशस्त्र सीमा बल राजस्थान सेंटर येथे इंस्टेस्टर म्हणून कार्यरत आहेत. गणेश नष्टे, त्यांची पत्नी सारिका, दोन मुलं (श्रीधर आणि श्रेयस) हे आढेगावमध्ये वास्तव्याला आहेत. ही घटना टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सशस्त्र सीमा बलात कार्यरत गणेश नष्टे यांच्याकडे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर आहे. ते जेव्हा गावी घरी येतात, तेव्हाही त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हर असते. हेच रिव्हॉल्व्हर वापरुन १४ वर्षीय श्रीधर नष्टेने आत्महत्या केली. आज (२७ जानेवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास श्रीधरने रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

शाळेत जाणाऱ्या १४ वर्षाच्या श्रीधरच्या आत्महत्या करण्यामागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली आहे. त्यांनी कुटुंबातील सदस्यांचीही चौकशी केली आहे. इतक्या लहान वयात आत्महत्या करण्याचा निर्णय त्याने का घेतला याचा शोध स्थानिक पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरात DJ विरोधात आज ‘मूक मार्च’काढण्यात येणार

Sugar Free Modak : ना शुगर ना मैदा! खजूर-अंजीरचे मोदक बनवा झटपट, डायबिटीज असणारेही आवडीने खातील

Rain Update : राज्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुंबईसह २० जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; वाचा हवामानाचा अंदाज

Manache Ganpati : बाप्पाच्या आगमनाची वेळ ठरली! पुण्यातील मानाचे ५ गणपती कधी विराजमान होणार? वेळ आणि पथकांची यादी एका क्लिकवर

Nerul Tourism : मॉन्सूनमध्ये नेरुळची सफर ठरेल अविस्मरणीय, वीकेंडला फिरायला 'ही' ५ ठिकाणं आहेत एकदम खास!

SCROLL FOR NEXT