On the occasion of Sushants death anniversary Riya gets emotional 
सिटीझन रिपोर्टर

सुशांतच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने रिया झाली इमोशनल म्हणाली.. 

वृत्तसंस्था

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या Sushan singh Rajput निधनाला आज एक वर्षे पूर्ण झाली आहेत. आजही चाहत्यांच्या Fans मनातील त्याची जागा कायम आहे आणि असेच कायम राहणार आहे. मात्र आता फक्त त्याच्या आठवणीं त्याच्या फॅन्स साठी उरल्या आहेत. या आठवणींना त्याच्या पहिल्या पुण्यतिथीच्या वेळेस सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने Rhea Chakraborty भावूक पोस्ट लिहून उजाळा दिला आहे. काही वेळापूर्वी रियाने आपल्या इंस्टाग्रामवर सुशांत आणि तिचा फोटो शेअर केला आहे. तिची ही पोस्ट आता व्हायरल होताना दिसत आहे. On the occasion of Sushants death anniversary Riya gets emotional

रिया चक्रवर्तीने तिचा आणि सुशांतचा फोटो शेअर केला आहे. तिने इंस्टाग्रामवर Instagram लिहिले की, एक क्षणदेखील असे वाटत नाही की आता तू माझ्याजवळ नाही आहेस. वेळ सर्व काही ठीक करते असं लोक म्हणतात. माझ्यासाठी तुच माझा वेळ आणि तूच माझे सर्व काही होतास. मला माहित आहे की वरून तू मला पाहत आहेस. चंद्रावरून तू मला तुझ्या दुर्बीणीतून पाहत आहेस. माझी रक्षा करत आहेस. मी दररोज तू मला घ्यायला येशील म्हणून तुझी वाट पाहत असते. मी तुला नेहमी सगळीकडे शोधत असते..... 

रियाने पुढे म्हटले, मी दररोज कोलमडून जाते. मग मला तू सांगितलेली गोष्ट आठवते. तुच मला सांगायचा ना की, तुझ्याकडे हा बेबू आहे. मग मी स्वतःला पुढील दिवसासाठी तयार करायचे. जेव्हा मला वाटते की तू इथे नाही आहेस, तेव्हा भावनांचा एक बंध माझ्या शरीराला पार करतो. माझ्या मनाला हे सर्व लिहिताना खूप वेदना होत आहेत.

रिया चक्रवर्तीही सुशांतच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती होती. सुशांत आणि रिया लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. त्यामुळे सुशांतच्या निधनानंतर तिच्यावर बरेच आरोप झाले. यासोबतच सुशांतच्या वडिलांनी तिच्यावर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. तसेच तब्बल १५ कोटी बळकावल्याचा देखील आरोप केला होता. सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडचे ड्रग्स कनेक्शन सर्वांसमोर आले.

रिया नुकतीच मोस्ट डिझायरेबल Most Desirable Woman ठरली आहे. शिवाय ती येत्या बिग बॉस Big Boss सिझन मध्येही झळकणार असल्याचे बोलले जात आहे.   

Edited By- Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : लोणावळा हादरलं! तरूणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, तिघांचे लाजिरवाणं कृत्य

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे प्रकरणात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

Sunday Horoscope : तुमचा निर्णय अचूक ठरणार, अडचणींवर मात करणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Tirgrahi Yog: 50 वर्षांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल त्रिग्रही योग; 3 राशींचं नशीब चमकणार, धनलाभ होणार

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT