अलीकडेच Xiaomi ने चीनमध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक सेडान कार ‘SU7’ लॉन्च केली आहे. ज्याची किंमत 215,900 युआन (जवळपास 24.92 लाख रुपये) ठेवण्यात आली आहे. ही कार काही 3 प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. ही कार चीनसह एकूण 29 देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. याची डिलिव्हरी एप्रिलपासून सुरू होणार आहे.
सध्या ही कार भारतात विक्रीसाठी उपलब्ध नाही. या कारला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या कारची 50 हजारांहून अधिक बुकिंग झाली आहे. Xiaomi SU7 चे डिझाइन खूप प्रीमियम आहे. ही कार दिसायला खूपच आकर्षक आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
एका रिपोर्ट्सनुसार, Xiaomi SU7 EV ला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या 27 मिनिटांत याला 50 हजारांहून अधिक बुकिंग मिळाले आहे. इतकेच नाही तर या कारने लॉन्च झाल्यानंतर अवघ्या 4 मिनिटांत 10 हजार बुकिंगचा विक्रमही केला आहे. Xiaomi SU7 ची किंमत Tesla Model 3 पेक्षा कमी आहे आणि याची रेंज जास्त आहे. या व्यतिरिक्त ही कार BYD शी देखील स्पर्धा करेल. (Latest Marathi News)
Xiaomi SU7 दोन बॅटरी पॅकसह येते. यात 73.6kWh आणि 101kWh चा बॅटरी पॅक आहे. पूर्ण चार्ज केल्यावर ही कार अनुक्रमे 700 किलोमीटर आणि 810 किलोमीटरची रेंज देते, असा दावा कंपनीने केला आहे. कंपनी आगामी काळात 150kWh बॅटरी पॅकसह ही कार लॉन्च करण्याचा विचार करत आहे. जी एका चार्जमध्ये 1200 किलोमीटरची रेंज देईल.
ही इलेक्ट्रिक कार अल्ट्रा फास्ट चार्जिंगसह उपलब्ध असेल. Xiaomi चा दावा आहे की, ही कार फक्त 15 मिनिटांच्या चार्जवर 350km ची रेंज देईल. ही कार 5.28 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडते. Xiaomi SU7 ची डिझाइन टेस्ला आणि पोर्श सारखी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.