Mukyamantri Ladki Bahin Yojana Saam Digital
बिझनेस

Ladki Bahin Yojana : आचारसंहिता लागली! आता लाडक्या बहि‍णींना दिवाळीचे पैसे मिळणार का? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : आचारसंहिता लागल्यानंतर देखील लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळणार की नाही? याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

Ladki Bahin Yojana News: राज्यात विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजल्यापासून विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाली. आताचसंहिता लागल्यानंतर सर्व पक्षांवर काही निर्बंध लावले जातात. त्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होते. त्यात आता लाडक्या बहि‍णींना दिवाळीत पैसे मिळणार की नाही अशी चर्चा आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी लाखो महिलांना फॉर्म भरलेत. यातील काही महिलांच्या खात्यात पैसे देखील जमा झाले आहेत. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर होती. तोपर्यंत अनेक महिलांनी फॉर्म भरला आहे. आता या महिलांना अद्याप पैसे आलेले नाहीत. त्यामुळे पैसे पुढे येणार की नाही असा प्रश्न महिलांच्या मनात उपस्थित होत आहे.

सध्या ऑक्टोबर महिना सुरू आहे. याच महिन्याच्या शेवटी २९ ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. दिवाळीला सुरुवात होत असल्याने पुढच्या महिन्यात भाऊबीज सुद्धा आहे. त्यामुळे भाऊबीजनिमित्त या योजनेतून प्रत्येक बहिणीला भाऊबीज मिळणार होती. मात्र आता आचारसंहिता लागल्याने सरकारकडून या योजनेचे पैसे दिल्यास कारवाई होण्याची शक्यता आहे.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही पक्षाला जनतेला पैसे वाटप, योजनांचा लाभ देणे अशा काही गोष्टींवर निर्बंध असतो. त्यामुळे लाडक्या बहिणीचे पैसे आता महिलांच्या खात्यात जमा झाल्यास महायुतीला कारवाईचा सामना कारावा लागू शकतो.

त्यात सप्टेंबर महिन्यापर्यंत ज्या महिलांना योजनेचा फॉर्म भरला त्यांना राज्य सरकारने दिवाळीआधीच दोन महिन्याचे पैसे एकत्र दिलेत. यावरच आता राज्य निवडणूक आयोगाने मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी म्हटलं की "आचारसंहिता लागू झाल्यावर योजना राबविण्यात आली का? निधी देण्यात आला का ? यावर आम्ही तपास करु." असं त्यांनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणूक केव्हा?

महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक होणार असून याची तारीख २० नोव्हेंबर आहे. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत ही माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raw Banana Curry Recipe: फक्त काही मिनिटांत बनवा हिरव्या केळ्याची स्वादिष्ट करी, वाचा स्टेप-बाय-स्टेप रेसिपी

Accident: वारकऱ्यांना घेऊन जाणारी एसटी बस रस्त्यावर उलटली, ३० प्रवासी गंभीर जखमी

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

CA Topper 2025: छत्रपती संभाजीनगरच्या लेकाचा देशात डंका! राजन काबरा CA परीक्षेत पहिला

Maharashtra Rain: मुंबईसह ठाण्यात तुफान पाऊस, राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

SCROLL FOR NEXT