vodafone idea  Saam tv
बिझनेस

Share Market : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शेअर बाजारात भूकंप; व्होडाफोन आयडियाच्या शेअर्सवर काय परिणाम झाला? वाचा

vodafone idea share news : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शेअर बाजारात मोठा बदल पाहायला मिळाला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर व्होडाफोन आयडियाच्या शेअर्सवर परिणामा झाला. वाचा नेमकं काय झालं?

Vishal Gangurde

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शेअर बाजारात शुक्रवारी मोठी पडझड झाली. कोर्टाच्या निर्णयानंतर व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये ही मोठी पडझड दिसून आली. कंपनीचा शेअर शुक्रवारी १० रुपयांनी घसरला. कंपनीचा शेअर ९.७९ रुपयांनी ५२ आठवड्यांच्या निचांक पातळीपर्यंत घसरल्याचं दिसून आला.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शुक्रवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर व्होडाफोन आयडियाचा शेअर १ टक्क्यांनी वधारला. सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाने व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये बदल पाहायला मिळाला. एजीआरमधील कथित त्रुटीमध्ये सुधारणा करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली. याचा परिणाम व्होडाफोन आयडियाच्या शेअर्सवर पाहायला मिळाला.

दरम्यान, ब्रोकरेज फर्मने नोट्समध्ये व्होडाफोन आयडियाला सरकारचा पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं. ब्रोकरेज हाऊसचं म्हणणं आहे की, व्होडाफोन आयडियाने त्यांचा जुना काळ मागे सोडला आहे. कंपनीचा शेअर मीडियमहून लाँग टर्ममध्ये १५ रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या घटनापीठाने याबाबत निर्णय घेतला. सुप्रीम कोर्टाने खुल्या कोर्टात सुनावणीसाठी क्युरेटिव्ह याचिकांची यादी करण्याची विनंतीची याचिका फेटाळली. क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयात शेवटचा पर्याय असतो. यानंतर कोर्टात दाद मागण्याचा कोणताही कायदेशीर मार्ग नसतो. या याचिकेवर बंद खोलीत विचार केला जातो.

दरम्यान, अमेरिकेतील घडामोडींचा थेट भारतीय शेअर बाजारावर परिणाम होत आहे. अमेरिकेत पॉलिसी रेट ५० बेस पॉइंट्सने कमी झाला आहे. यामुळे अमेरिकेतील व्याजदर ५ टक्क्यांनी घसरला आहे. अमेरिकेच्या व्यादरात घसरण झाल्यानंतर रिझर्व्ह बँक काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : मुंबईला आज पुन्हा रेड अलर्ट

Moong Dal Bhaji: रिमझिम पावसात घरीच बनवा गरमा गरम मूग भजी; १० मिनिटांत होईल रेसिपी

Monsoon Foot Infection: पावसाच्या पाण्यामुळे पायांना चिखल्या झाल्यास घरगुती उपाय काय करावे?

Cheese Recipe : विकत कशाला? घरीच १० मिनिटांत बनवा हेल्दी चीज

Amitabh Bachchan : मुंबईत पावसाचा हाहाकार; बिग बींच्या बंगल्यातही शिरले पाणी, पाहा व्हायरल VIDEO

SCROLL FOR NEXT