Vivo Samartphone Offer Saam Tv
बिझनेस

Smartphone: Vivo चे दोन तगडे फीचर्स असलेले फोन ३ हजारांनी स्वस्त; जाणून घ्या मॉडेल आणि किंमत

Vivo Y27 And Vivo T2 5G: विवो कंपनी ही स्मार्टफोनमध्ये नावाजलेली कंपनी आहे. कंपनी नेहमी ग्राहकांसाठी नवनवीन फोन लाँच करत असते. तसेच अनेक फोनवर ऑफर देत असते. कंपनीने नुकत्याच दोन फोनच्या किंमती कमी केल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Vivo Y27 And Vivo T2 5G New Prices:

विवो कंपनी ही स्मार्टफोनमध्ये नावाजलेली कंपनी आहे. कंपनी नेहमी ग्राहकांसाठी नवनवीन फोन लाँच करत असते. तसेच अनेक फोनवर ऑफर देत असते. कंपनीने नुकत्याच दोन फोनच्या किंमती कमी केल्या आहेत. त्यामुळे तुम्ही जर फोन घ्यायचा विचार करत असाल तर हा फोन घेऊ शकता.

विवो कंपनीने Vivo Y27 आणि Vivo T2 5G च्या किंमती कमी केल्या आहेत. जवळपास ३ हजार रुपयांनी कंपनीच्या फोनची किंमत कमी केली आहे. तसेच बँक कार्डवर तुम्ही फोन केला तर तुम्हाला १ हजार रुपयांची सवलत दिली जाते. (Latest News)

Vivo Y27ची नवीन किंमत

Vivo Y27 या स्मार्टफोनची किंमत ३ हजार रुपयांनी कमी केली आहे. कंपनीचा 6GB+ 128GB स्टोरेजचा फोन १४,९९९ रुपयांना लाँच करण्यात आला होता. आता या स्मार्टफोनची किंमत ११,९९९ रुपये झाली आहे. जी व्यक्ती एसबीआय, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, बँक ऑफ बडोदा, डीबीएस बँक, फेडरल बँक, इंडसलँड बँक कार्डचा वापर करुन खरेदी केल्यास १ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. हा स्मार्टफोन तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुन खरेदी करता येईल.

Vivo T2 5Gची नवीन किंमत

Vivo T2 5G चा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजचा फोन भारतात १८,९९९ रुपयांना लाँच केला होता. या फोनची किंमत आता १५,९९९ रुपये केली आहे. तर 8GB रॅम आणि 128GB व्हेरियंटची किंमत २०,९९९ रुपये होती. ही किंमत आता १७,९९९ रुपयांना मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT