Veg Non-Veg Thali Cost Down Saam Tv
बिझनेस

Veg Non-Veg Thali Cost Down : खाद्यप्रेमींसाठी खुशखबर! शाकाहारी-मांसाहरी जेवण झालं स्वस्त, कारण काय?

Cost Of Vegetarian Thali : खाद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. चमचमीत पदार्थ चाखण्यासाठी अधिक किमत मोजावी लागणार नाही.

कोमल दामुद्रे

Veg Thali Cost:

वींकेड, महत्त्वाचा दिवस किंवा आयुष्यातील कुठल्याही खास क्षणी आपला आनंद साजरा करण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जातो. चमचमीत पदार्थांची चव चाखण्यासाठी किंवा खास क्षणाला द्विगुणीत करण्यासाठी प्रियजनांना ट्रिट देतो. परंतु खाद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे.

खाद्यप्रेमींना चमचमीत पदार्थ चाखण्यासाठी अधिक किमत मोजावी लागणार नाही. वाढती महागाई, भाज्याचे दर, सिलिंडरचे वाढते भाव यामुळे जेवणाची थाळी महागली होती. सध्या टोमॅटोचे दर घसरल्यामुळे शाकाहारी आणि मांसाहरी थाळींच्या किमती देखील कमी झाल्या आहेत. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तापत्रात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड अॅनालिटिक्सच्या रोटी राईस रेट (RRR) नुसार सप्टेंबर महिन्यात जेवणाच्या (Food) थाळीत १७ टक्क्यांनी घसरण दिसून आली आहे.

1. मांसाहरी थाळीही सवस्त

अहवालानुसार असे सांगण्यात आले की, मांसाहरी थाळीत सरासरी ९ टक्क्यांनी घट झाली आहे. मागच्या महिन्यात टोमॅटो दर ६२ टक्के घसरुन ३९ रुपये किलो झाले. मागील काळात कांद्याच्या दरात १२ टक्क्यांनी वाढ झाली त्यामुळे कांदा (Onion) पुन्हा रडवणार हा प्रश्न पडला आहे.

2. जेवणाची थाळी का महागली?

जेवणाच्या थाळीत एकूण खर्चात १४ ते ८ टक्के योगदान इंधनाच्या (Petrol) दराचे असतात. या खर्चात सप्टेंबरमध्ये १८ टक्क्यांनी घसरण झाली आहे. कारण घरगुती गॅस सिलिंडरच्या दरातही घसरण झाली आहे. परंतु मागच्या काही काळात इंधनाचे वाढते दर, सिलिंडरच्या वाढत्या किमतीमुळे जेवणाच्या थाळीवर त्याचा परिणाम दिसून आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT