WhatsApp Security Alert saam tv
बिझनेस

WhatsApp Security: WhatsApp वापरताय? मग लगेच ON करा हे 7 सिक्युरिटी फीचर्स; स्कॅमर्सपासून अकाउंट राहील सुरक्षित

WhatsApp Privacy : व्हॉट्सॲप वापरताय मग अनोळखी कॉल्स, ऑनलाइन स्कॅम आणि हॅकिंगपासून अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी टू स्टेप व्हेरिफिकेशनसह हे ७ महत्त्वाचं सिक्युरिटी फीचर्स लगेच ON करा आणि फसवणूक टाळा.

Sakshi Sunil Jadhav

आजच्या डिजिटल युगात WhatsApp चा वापर केवळ मेसेज पाठवण्यासाठीच नाही, तर व्हिडिओ कॉल, महत्त्वाची कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित माहिती शेअर करण्यासाठीही केला जातो. मात्र, याच WhatsApp चा वापर सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी करत आहेत.

कधी अनोळखी लिंक पाठवून, तर कधी पोलीस किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना डिजिटल अरेस्टची धमकी दिली जाते. अशा वेळी तुमचे WhatsApp अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे सिक्युरिटी फीचर्स उपयोगी ठरू शकतात.

WhatsApp चे हे 7 सिक्युरिटी फीचर्स लगेच करा ON

1. अनोळखी कॉल्स होतील सायलेंट

WhatsApp मधील Silence Unknown Callers हे फीचर ON केल्यास अनोळखी नंबरवरून येणारे कॉल आपोआप सायलेंट होतात. यामुळे स्पॅम आणि संशयास्पद कॉल्सचा त्रास कमी होतो. यासाठी Settings मध्ये जाऊन Privacy आणि त्यानंतर Calls पर्याय निवडा.

2. अनोळखी कॉलरची माहिती तपासा

काही अनोळखी कॉलर्सबाबत WhatsApp अतिरिक्त माहिती दाखवू शकते. यामध्ये नंबर कोणत्या देशात रजिस्टर आहे आणि तुमचा संबंधित व्यक्तीसोबत कोणता कॉमन ग्रुप आहे का, याची माहिती मिळू शकते. त्यामुळे कॉल उचलण्यापूर्वी सावध राहता येते.

3. Two-Step Verification करा ON

तुमच्या WhatsApp अकाउंटला अतिरिक्त सुरक्षा देण्यासाठी Two-Step Verification फीचर महत्त्वाचे आहे. Settings मध्ये Account आणि Two-Step Verification पर्याय निवडा. यामुळे अकाउंट पुन्हा व्हेरिफाय करताना अतिरिक्त PIN आवश्यक असतो.

4. संशयास्पद नंबर ब्लॉक आणि रिपोर्ट करा

एखादी अनोळखी व्यक्ती पैशांची मागणी करत असेल, संशयास्पद लिंक पाठवत असेल किंवा वैयक्तिक माहिती मागत असेल, तर त्या नंबरला Block आणि Report करा.

5. Linked Devices नियमित तपासा

तुमचे WhatsApp अकाउंट कोणत्या डिव्हाइसवर लॉगिन आहे, हे तपासण्यासाठी Settings मधील Linked Devices पर्याय उघडा. अनोळखी डिव्हाइस दिसल्यास त्वरित Log Out करा. कोणालाही लिंकिंग कोड देऊ नका किंवा अनोळखी QR कोड स्कॅन करू नका.

6. कॉलदरम्यान IP Address सुरक्षित ठेवा

Protect IP Address in Calls हे फीचर ON केल्यास WhatsApp कॉल कंपनीच्या सर्व्हरद्वारे रूट होतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमचा IP Address थेट दिसण्यापासून संरक्षण मिळते. यासाठी Privacy मधील Advanced पर्यायात जा.

7. अनोळखी लोकांना ग्रुपमध्ये जोडण्यापासून रोखा

Settings मधील Privacy आणि Groups पर्याय निवडा. येथे My Contacts हा पर्याय निवडल्यास तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांनाच तुम्हाला थेट ग्रुपमध्ये जोडता येईल.

फसवणूक झाल्यावर कुठे तक्रार कराल?

ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या सायबर क्राइम हेल्पलाइनवर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in या अधिकृत वेबसाइटवर तक्रार नोंदवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: ६ जिवलग मित्रांचा एकाच दिवशी करुण अंत, देवदर्शनाला जाताना काळाचा घाला

Alkaline Water Benefits: अल्कलाईन वॉटर म्हणजे काय? कोणी प्यावे आणि कोणी पिणे टाळावे? जाणून घ्या फायदे

NCP Merger : पुन्हा भूकंप होणार? अजित पवार गटाच्या आमदारांनी मागितली शरद पवारांची वेळ, काहीतरी मोठं घडणार?

Onion For High Cholesterol: रोज कांदा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं? डॉक्टरांनी सांगितलं कोणी खाल्ला पाहिजे

Maharashtra News Live Update: दिवाळीच्या सुट्ट्यांत रायगड पर्यटकांनी गजबजले! अलिबागमध्ये दोन दिवसांत २० हजार पर्यटकांची हजेरी

SCROLL FOR NEXT