Upcoming SUV In 2024 Saam Tv
बिझनेस

Upcoming SUV: दमदार मायलेज, जबरस्त लूकसह नवीन वर्षात लाँच होणार 'या' एसयूव्ही; किंमत १५ लाखांपेक्षा कमी

Upcoming SUV In 2024: नवीन वर्षात अनेक कार लाँच होणार आहेत. येत्या वर्षी १५ लाख किंमतीच्या आता काही एसयूव्ही लाँच होणर आहेत. या कारची यादी पाहा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Upcomig SUV In 2024 Under 15 Lakh :

नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. नवीन वर्षात अनेक लोक काही न काही नवीन वस्तू घेण्याचा विचार करतात. त्यात अनेक लोक कार घेतात. नवीन वर्षात अनेक कार लाँच होणार आहेत. जर तुम्हीही कार घ्यायचा विचार करत असाल तर ही यादी पाहा.

नवीन वर्षात अनेक कार लाँच होणार आहे. सेफ्टी, उत्तम फिचर्स आणि नवीन लूक यांसह बाजारात एसयूव्ही लाँच होणार आहेत. या एसयूव्हीची किंमत १५ लाखांपर्यंत आहे. याच कारबद्दल जाणून घेऊया. (Latest News)

Hyundai Creta Facelift

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट ही कार येत्या वर्षात लाँच होणार आहे. ह्युंदाईच्या या कारमध्ये अनेक नवीन बदल पाहायला मिळणार आहे. १६ जानेवारी २०२४ रोजी ही कार लाँच केली जाईल. या कारमध्ये 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन देखील मिळेल. जे 160 PS आणि 253 Nm टॉर्क जनरेट करेल. याशिवाय कारमध्ये लेवल 2 एडीसचा समावेश केला जाईल.

Kia Sonet Facelift

किया कंपनीने काही आठवड्यांपूर्वी Kia Sonet Facelift चा जागतिक प्रिमियर आयोजित केला होता. या कारची किंमत जानेवारी २०२४ मध्ये जाहीर केली जाणार आहे. या कारची बुकिंग सुरु झाली आहे. ही कार रिटर्निंग डिझेल एमटी वेरियंट वगळाता सर्व प्रकारांमध्ये बाजारात उपलब्ध होईल. कंपनीच्या इतर कारच्या तुलनेत या कारचे डिझाइन खूप वेगळे असणार आहे.

Toyota Urban Cruiser Taisor

Toyota Urban Cruiser Taisor कार २०२४ मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. ही कार Maruti Suzuki Fronx बॅज इंजिनीयर्डची नवीन आवृत्ती असेल. या कारमध्ये 1.2L पेट्रोल NA मिल और 1.0L टर्बो पेट्रोल युनिट दिले जाईल. कार मॅन्युअल, स्वयंचलित आणि ट्रान्समिशन पर्यांयासह उपलब्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

SCROLL FOR NEXT