Upcoming Bikes Saam Tv
बिझनेस

या दमदार बाईक्स ऑगस्टमध्ये होणार लॉन्च, 3 नंबरची बाईक आहे जबरदस्त

Upcoming Bikes: तुम्हीही नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही दिवस वाट पाहा. आज आम्ही तुम्हाला त्या बाईक्सची माहिती देणार ​​आहोत, ज्या या महिन्यात लॉन्च होणार आहेत.

Satish Kengar

ऑटो क्षेत्रासाठी ऑगस्ट महिना खूप खास असणार आहे. या महिन्यात अनेक जबरदस्त बाईक लॉन्च होणार आहेत. तुम्हीही नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही दिवस वाट पाहा. आज आम्ही तुम्हाला त्या बाईक्सची माहिती देणार ​​आहोत, ज्या या महिन्यात लॉन्च होणार आहेत.

Royal Enfield Classic 350

Royal Enfield 12 ऑगस्ट रोजी नवीन J-Series प्लॅटफॉर्मवर नवीन फेसलिफ्टेड क्लासिक 350 लॉन्च करेल. या बाईकच्या डिझाइनमध्ये बरंच काही नवीन पाहायला मिळू शकतं. ज्यासाठी याच्या बॉडी टँकपासून ते ग्राफिक्सपर्यंत बदल केले जात आहेत.

लॉन्च होण्याआधीच याचे काही फीचर्स लीक झाले आहेत. नवीन मॉडेलमध्ये 350cc इंजिन दिले जाईल. हे इंजिन सध्याच्या मॉडेलला पॉवर देते आणि 20.2 bhp पॉवर आणि 27 Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक 32 kmpl पर्यंत सहज मायलेज देईल.

BSA Gold Star

ब्रिटिश टू व्हीलर उत्पादक BSA आपली नवीन बाईक BSA Gold Star 15 ऑगस्ट रोजी लॉन्च करणार आहे. नवीन बाईक रॉयल एनफिल्ड आणि जावाशी स्पर्धा करेल. नवीन BSA Gold Star 650 मध्ये 650cc सिंगल सिलेंडर इंजिन मिळू शकते, जे 45bhp पॉवर आणि 55Nm टॉर्क जनरेट करते.

बाईकला 17 आणि 18 इंच टायर मिळतील. याशिवाय ड्युअल डिस्क ब्रेक, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, सिंगल सीट, 41 मिमी टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, डिजिटल स्पीडोमीटर, एलईडी हेड लॅम्प, एलईडी हेडलाइट आणि रुंद हँडलबार मिळू शकतो. या बाईकच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही, मात्र अंदाजे 3 लाख रुपये किमतीत ही बाईक लॉन्च केली जाऊ शकते.

Ola Electric Bike

ओला इलेक्ट्रिक 15 ऑगस्ट रोजी आपली नवीन बाईक लॉन्च करणार आहे. अलीकडेच कंपनीने नवीन मॉडेलचा टीझर देखील जारी केला आहे. नवीन मॉडेल एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये असेल. याची किंमत कमी असेल आणि मायलेजही जास्त असू शकते. ही बाईक किती किमीची रेंज देईल, याबाबत अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही. बाईक लॉन्च झाल्यानंतरच याच्या किंमत, फीचर्स आणि रेंजबद्दल माहिती मिळू शकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

SCROLL FOR NEXT