Royal Enfield Shotgun 650 Saam Tv
बिझनेस

Royal Enfield Shotgun 650: बाजारात धिंगाणा! आली नवीन रॉयल एनफील्ड शॉटगन 650; जाणून घ्या किंमत

Upcoming Bikes : प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी रॉयल एनफील्ड आपली नवीन शॉटगन 650 बाईक जागतिक बाजारात सादर केली आहे.

Satish Kengar

Royal Enfield Shotgun 650:

प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी रॉयल एनफील्ड आपली नवीन शॉटगन 650 बाईक जागतिक बाजारात सादर केली आहे. शॉटगन 650 सुपर मेटिअर 650 सह प्लॅटफॉर्म शेअर करते. मात्र, रॉयल एनफिल्डने त्यात काही बदल केले आहेत.

Royal Enfield पुढील वर्षाच्या सुरुवातीला Shotgun 650 लॉन्च करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याच बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रॉयल एनफील्ड शॉटगन 650 चार रंग पर्यायांमध्ये सादर केली जाईल. यात स्टॅन्सिल व्हाइट, प्लाझ्मा ब्लू, ग्रीन ड्रिल आणि शीटमेटल ग्रे रंगाचा समावेश आहे. बाईकमध्ये फॅक्टरी-फिटेड ट्यूबलेस टायर्ससह 18-इंच फ्रंट आणि 17-इंच अलॉय व्हील असतील. रॉयल एनफिल्ड अॅलॉय व्हीलचे डायमंड-कट व्हेरियंट देखील अॅक्सेसरी म्हणून विकेल. (Latest Marathi News)

बाईकच्या सस्पेन्शनबद्दल बोलायचे झाले तर, यात पुढील बाजूस 43mm मोठे पिस्टन शोवा फोर्क्स आणि मागील बाजूस ट्विन ट्यूब 5-स्टेप शॉक अॅब्जॉर्बर सस्पेंशन आहे. शॉटगन 650 च्या सीटची उंची 795 मिमी आणि व्हीलबेस 1,465 मिमी आहे. Royal Enfield समोर 320mm डिस्क आणि मागील बाजूस 300mm डिस्क वापरत आहे. ऑफरवर ड्युअल-चॅनल ABS असेल.

कंपनीने सांगितलं आहे आहे की, शॉटगन 650 एलईडी हेडलॅम्प, डिजी-एनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ट्रिपर नेव्हिगेशन, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि रॉयल एनफील्ड विंगमॅन सपोर्टसह येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT