Union Budget 2025 Memes  x Social Media
बिझनेस

Union Budget 2025: बजेटआधी सोशल मीडियावर मीम्स जबरदस्त व्हायरल, पोस्ट पाहून पोट धरून हसाल

Union Budget 2025 Memes : मोदी सरकार एक फेब्रुवारीला आपल्या पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. यात मध्यमवर्गातील लोकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

मोदी सरकार एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहे. यावेळचा अर्थसंकल्प सरकार आणि जनता या दोघांसाठी खास आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पाकडून जनतेला अनेक अपेक्षा आहेत. व्यापारी वर्गाला जीएसटी स्ट्रक्चरवर मध्ये बदल करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. बजेट सादर होण्याआधीच सोशल मीडियावर बजेटवरून मीम्स व्हायरल होत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील गरीब आणि मध्यम वर्गाला लाभ होण्यासाठी लक्ष्मी मातेची प्रार्थना केली आहे. संसदेच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना मोदींनी सांगितलं की, देशातील गरीब आणि मध्यम वर्गाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळावा यासाठी मी लक्ष्मी मातेकडे प्रार्थना केलीय. पंतप्रधान मोदींच्या या विधानावरून अर्थसंकल्प २०२५ मध्ये मध्यमवर्गाला दिलासा मिळेल. दरम्यान त्याआधी मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आर्थिक सर्व्हेक्षण सादर करण्यात आलाय. आगामी आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी ६.३ टक्के ते ६.८ टक्के होण्याचा अंदाज या सर्व्हेक्षणातून वर्तवण्यात आलाय. उत्पादन क्षेत्र आणि कॉरपोरेट गुंतवणूक मंदावल्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झालाय. चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर ६.४ टक्के असू शकतो. हा विकासदर मागील ४ वर्षाच्या तुलनेत आहे.

मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा पडझड पाहायला मिळत आहे. भारताला २०३० पर्यंत दरवर्षी ७८.५ लाख नवीन बिगरशेती नोकऱ्या निर्माण करण्याची गरज असल्याचं यातून सांगण्यात आलंय. आपल्या शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता सुधारणे आणि भविष्यासाठी तयार पायाभूत सुविधा निर्माण करणे देखील आवश्यक असल्याचं सर्व्हेक्षणात सांगण्यात आलंय.

विकास आणि समृद्धी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून कोणत्याही अर्थव्यवस्थेतील रोजगाराचे प्रमाण आणि गुणवत्ता हे ठरवते की आ, असे सर्वेक्षणात म्हटलंय आहे. १०-२४ वयोगटातील सुमारे २६ टक्के लोकसंख्येसह भारत अव्वल आहे. जागतिक स्तरावर भारताची स्थिती सर्वात वाईट असल्याचे या सर्वेक्षणात म्हटलंय. भारत हा तरुण देशांपैकी एक आहे. भारताचे आर्थिक यश ते आपली तरुण कार्यशक्ती किती उत्पादक बनवू शकते यावर अवलंबून असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT