Business Idea saam tv
बिझनेस

Business Idea: घरबसल्या लखपती करेल तुम्हाला हा बिझनेस; फार कमी लोकांना माहिती असलेला बिझनेस ९९ % होतो यशस्वी!

Business Idea: आज आम्ही तुम्हाला अशीच कमीत कमी गुंतवणूकीचा बिझनेस सांगणार आहोत. हा बिझनेस कोणीही करू शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

नोकरीच्या डेडलाईनला वैतागला आहात? तुम्हालाही नोकरी सोडून बिझनेस करण्याची इच्छा आहे? मात्र कोणता बिझनेस करावा हे सुचत नाहीये, तर आज आम्ही तुम्हाला अशीच कमीत कमी गुंतवणूकीचा बिझनेस सांगणार आहोत. हा बिझनेस कोणीही करू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला खरंच बिझनेस करायची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्या फायद्याची असू शकते.

आपल्या देशात चहा कोणत्या व्यक्तीला आवडत नसेल. देशातील बहुतांश घरांमध्ये सकाळची सुरुवात चहाने होते. त्याच्या नावानेच चहा पिण्याची इच्छा निर्माण होते. गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकालाच चहाची गरज असते. चहाला भारतातच नाही तर परदेशातही मागणी आहे. अशा परिस्थितीत चहाच्या पावडरचा बिझनेस तुम्हाला मालामाल करू शकतो.

चहाच्या पानांचा बिझनेस

चहा पावडरच्या बिझनेसमधून तुम्ही घरबसल्या भरपूर कमाई करू शकता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा बिझनेस सुरू करण्यासाठी जास्त पैशांची गरज नाहीये. हा व्यवसाय फक्त 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीने सुरू करता येऊ शकतो.

अनेक पद्धतींनी होऊ शकतो चहाच्या पानांचा बिझनेस

तुम्ही बाजारात चहाची पावडर विकू शकता. किंवा तुम्ही किरकोळ आणि घाऊक दरात चहाच्या पावडरचा व्यवसाय देखील करू शकता. याशिवाय चहा विकण्यासाठी तुम्ही अनेक मोठ्या कंपन्यांकडून फ्रँचायझी देखील घेऊ शकता. सुटी चहाची पावडर विकण्यासाठी फ्रँचायझी अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे घरोघरी चहाच्या पावडरची विक्री हा एक पर्याय असू शकणार आहे.

महिन्याला किती होईल कमाई

आसाम आणि दार्जिलिंगची चांगली चहाची पावडर 140 ते 180 रुपये प्रति किलो या दराने सहज उपलब्ध आहेत. अशावेळी तुम्ही स्थानिक बाजारात 200 ते 300 रुपये प्रति किलो दराने ही पानं विकू शकता. फक्त 5000 रुपयांपासून सुरू करून तुम्ही या व्यवसायातून दरमहा 20,000 रुपयांपर्यंत सहज कमाई करू शकता. तुम्हाला तुमचा व्यवसाय ब्रँड करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला कंपनीची नोंदणी करावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला; भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या जवळच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या, घटनाक्रम आला समोर

मंत्री छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? राजकीय घडामोडींना वेग|VIDEO

मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सुवेंदू अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्या, थरकाप उडवणारा VIDEO समोर

West bengal CM Race: भाजपचं धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट, महिला नेत्या अचानक दिल्लीत धडकल्या

लग्नाआधी वजन घटवण्याचं औषध? दिखाव्याच्या दुनियेत आरोग्याशी खेळ

SCROLL FOR NEXT