Tata New IPO saam Tv
बिझनेस

Tata New IPO : टाटा ग्रुपमध्ये गुंतवणूक करुन कमाईची संधी, १९ वर्षांनंतर येणार IPO

IPO Hit Market : टाटा कंपनीचा IPO तब्बल १९ वर्षांनी बाजारात येत असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

कोमल दामुद्रे

Tata Tech IPO :

शेअर बाजारात जर तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी खास संधी आहे. दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या कंपनीचा IPO लवकरच बाजारात येणार आहे. टाटा कंपनीचा IPO तब्बल १९ वर्षांनी बाजारात येत असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

टाटा टेक्नॉलॉजी ही टाटा मोटर्सची सह उत्पादन कंपनी आहे. मंगळवारी ३ ऑक्टोबरला टाटा टेक्नॉलॉजीने त्यांच्या IPO च्या DRHP साठी माहिती सादर केली आहे. यापूर्वी टाटा कन्सल्टन्सीचा आयपीओ जुलै, २००४ मध्ये आला होता.

1. कर्मचाऱ्यांसाठी किती शेअर

टाटा (Tata) टेक्नॉलॉजीने कर्मचाऱ्यांसाठी कंपनीच्या पोस्ट ऑफर पेड- अप इक्विटी शेअर भांडवलाच्या ०.५ टक्क्यांपर्यंत असेल. तसेच ज्या गुंतवणूकदारांकडे टाटा मोटर्स लिमिटेडचे शेअर्स आधीपासून असतील त्यांना १० टक्क्यांपर्यंत ऑफर देण्यात येईल. कंपनी गुंतवणूकदारांना 9.57 कोटी शेअर्स ऑफर (Offer) करणार आहे.

त्यामध्ये IPO प्रति शेअर २ रुपये असेल. IPO पूर्णपणे ऑफर-फर-सेल (OFS) असेल. OFS अंतर्गत टाटा मोटर्स, अल्फा टीसी आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड असेल. यामध्ये सध्या टाटा टेकमध्ये 74.69%, अल्फा टीसी होल्डिंग्ज 7.26% आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंडकडे 3.63% हिस्सा आहे.

2. सेबीकडून मंजूरी

जेएम फायनान्शियल सिटी आणि बोफा सिक्युरिटीज यांची बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली. कंपनीने मार्च २०२३ मध्ये IPO साठी सेबीकडे कागदपत्र सादर केली होती त्याला २७ जून रोजी SEBI कडून मंजूरी मिळाली.

DISCLAIMER : शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे, म्हणून गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT