Financial investment yandex
बिझनेस

Investment: कमी काळात व्हाल कोट्यधीश! दरमहा २० हजार मिळतील अन् काही वर्षात ३ कोटी जमा होतील

SWP Investment Plan: महागाई वाढली आहे. दरमहा नियमित उत्पन्न हवंय? सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन स्कीम आहे उत्तम पर्याय. ही योजना म्युच्युअल फंड अंतर्गत येते आणि तुमचं आर्थिक भविष्य घडवू शकते.

Bhagyashree Kamble

महागाई झपाट्याने वाढत असताना लोकांच्या गरजाही वाढल्या आहेत. खर्च तर वाढलाच आहे, पण आता प्रश्न उभा राहतो, पैसे नेमके कुठे गुंतवावेत, जेणेकरून दरमहा हमखास उत्पन्न मिळेल? अशा वेळी एक उत्तम योजना आहे, सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन. ही योजना म्युच्युअल फंड अंतर्गत येते आणि तुमचं आर्थिक भविष्य घडवू शकते.

सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅन ही योजना म्युच्युअल फंड अंतर्गत येते. तुम्ही यात एकरकमी रक्कम जमा करू शकता आणि आयुष्यभर दरमहा नियमित उत्पन्न मिळवू शकता. विशेष म्हणजे उत्तम परताव्यामुळे आपल्याला व्याजासकट पैसे मिळतील. सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन एसआयपीपेक्षा उत्तम मानली जाते.

३ कोटी रुपये आणि मासिक उत्पन्न कसे मिळवायचे?

खरंतर, सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅनमध्ये तुम्ही काढलेल्या रकमेनंतर, खात्यात उरलेल्या पैशांवर व्याज मिळते. साधारणपणे, म्युच्युअल फंड दीर्घकालीन कालावधीत दरवर्षी १२% ते १५% देते. यात आपल्याला १०% पर्यंत परतावा नक्की मिळेल.

सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅनचे कॅल्क्युलेशन समजून घ्या

जर तुमचा निधी ५० लाख रुपये असेल आणि तुम्ही पुढील २५ वर्षांसाठी दरमहा २०,००० रुपये काढत असाल तर तुम्ही एकूण ६०,००,००० लाख रुपये काढाल. तरीही, तुमची एकरकमी गुंतवणूक रक्कम २,९७,९४,५६७ रुपये असेल म्हणजेच सुमारे ३ कोटी रुपये.

कारण दरमहा २०,००० रुपये काढल्यानंतर, तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये उरलेल्या रकमेवर व्याज देखील मिळेल. ज्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओचे मूल्य वाढतच राहील.

सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅन सुरू करताना काय लक्षात घ्यावं?

दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवणं महत्त्वाचं.

योग्य फंडाची निवड आवश्यक.

कर संकल्पनाही समजून घ्या.

एक फायनान्शियल सल्लागार घेणं उपयुक्त ठरू शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: युरिया टंचाईमुळे शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Beed Shocking : तरुण डॉक्टरची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

Nashik Honey Trap : नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची व्याप्ती वाढली; ७२ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डॉक्टर्स, व्यावसायिक अडकले

Konkan Railway: गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेची खास रो-रो सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Green Coffee : ग्रीन कॉफीने २ महिन्यात १७ किलो वजन झाले कमी, क्रिकेटपटू सरफराज खानने दिल्या सिक्रेट टिप्स

SCROLL FOR NEXT