Sukanya Samriddhi Yojana Saam Tv
बिझनेस

Sukanya Samriddhi Yojana : आनंदाची बातमी! नवीन वर्षापूर्वीच मोदी सरकारच मोठं गिफ्ट, सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात वाढ

SSY Scheme Details : नवीन वर्षापूर्वी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आनंदाची बातमी दिली आहे. नुकतेच अल्पबचत योजनेच्या व्याजदरात वाढ करुन सरकारने गुंतवणुकदारांना भेट दिली आहे.

कोमल दामुद्रे

Sukanya Samriddhi Yojana Scheme :

नवीन वर्षापूर्वी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आनंदाची बातमी दिली आहे. नुकतेच अल्पबचत योजनेच्या व्याजदरात वाढ करुन सरकारने गुंतवणुकदारांना भेट दिली आहे. सुकन्या समृद्धी योजनेच्या आर्थिक वर्षात २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीसाठी व्याजदर वाढवण्यात आला आहे.

यामध्ये ८.२ टक्क्यांनी व्याजदरात (Interest) वाढ केली आहे. यापूर्वी या योजनेवर गुंतवणुकदारांना ८ टक्क्यांनी व्याज दिले जात होते. अशातच सरकारने इतर योजनेच्या (Scheme) व्याजदरात वाढ केलेली नाही.

येत्या २०२३ -२४ च्या आर्थिक वर्षात चौथ्या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांचे व्याजदर जाहीर केले आहेत. जानेवारी ते मार्च या तिमाहीत सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ८.२ टक्के करण्यात आला आहे.

आर्थिक वर्षात सरकारने या योजनेसाठी व्याजदरात वाढ करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी पहिल्या तिमाहीत सरकारने सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ७.६ टक्क्यांवरुन ८ टक्के केला होता.

1. मुदत ठेव योजनेच्या व्याजदरातही वाढ

सुकन्या समृद्धी योजनेसोबतच तीन वर्षाच्या मुदत ठेवीवरील व्याजदरात ७ टक्क्यांवरुन तो ७.१ टक्के होईल. पीपीएफ आणि बचत ठेवींवरील व्याजदर हा ७.१ टक्के आणि चार टक्के कायम ठेवण्यात आला आहे.

तसेच किसान विकास पत्रावरील व्याज दर ७.५ टक्के आहे. याचा कालावधी हा ११५ महिने इतका आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट वरील व्याजदर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२४ या कालावधीसाठी ७.७ टक्के इतकाच आहे. मासिक उत्पन्न योजनेसाठी व्याजदरात कोणतीही वाढ झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे उद्या कर्जतला जाणार

100 कोटी रुपयांचा व्यवहार अन् 38 पथकांची 38 ठिकाणी धाडी,1424 बँक खाती फ्रिज; काय आहे सरकारचं ऑपरेशन ट्रायडेंट?

Diwali Kitchen Cleaning Tips: दिवाळीच्या साफसफाईत किचनच्या 'या' 7 जागांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पुन्हा काँग्रेसमध्ये येणार? संतप्त प्रतिक्रिया देत सर्वच सांगितलं

Height Growth Tips : उंची वाढवण्यासाठी हे विटामिन आहे सर्वात महत्त्वाचं! पालकांनो, आजच मुलांच्या आहारात करा हा बदल

SCROLL FOR NEXT