Ladki Bahin Yojana SAAM TV
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीच्या पैशांनी सुरु करा 'हा' बिझनेस; दर दिवसाला कराल हजारांची कमाई

Ladki Bahin scheme: योजनेद्वारे मिळालेले पैसे कुठे गुंतवायचे असा तुम्हाला प्रश्न असेल तर आम्ही मदत करणार आहोत. तुम्ही है पैसे एका बिझनेसमध्ये लावू शकता.

Surabhi Jayashree Jagdish

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चेचा विषय ठरतेय. महाराष्ट्रातील अनेक महिलांनी याचा लाभ घेतला आहे. या योजनेद्वारे मिळालेले पैसे कुठे गुंतवायचे असा तुम्हाला प्रश्न असेल तर आम्ही मदत करणार आहोत. तुम्ही है पैसे एका बिझनेसमध्ये लावू शकता. किंवा या पैशांद्वारे तुम्ही एक बिझनेस सुरु करू शकता.

व्यवसाय हे एक असं माध्यम आहे जिथून तुम्ही कमी वेळात चांगली कमाई करू शकता. आज आम्ही तुम्हाला जो बिझनेस सांगणार आहोत तो सुरु केल्यानंतर तुम्ही बंपर कमाई करू शकता. या व्यवसायात तुम्हाला कुल्लड बनवावे लागतील. आजकाल बस, रेल्वे स्टेशन आणि चहाच्या दुकानात कुल्लडचा चहा प्यायला आवडतो. अशा स्थितीत बाजारात कुल्लडला मोठी मागणी आहे.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे गुंतवण्याची गरज नाही. त्यामुळे लाडक्या बहिणीच्या हफ्त्यांची सेव्हिंग करून तुम्ही हा बिझनेस सुरु करू शकता. फक्त पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीने तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला चॉक विकत घ्यावा लागेल. सरकार कुल्लडला प्रोत्साहन देण्यासाठी कुम्हार सक्षमीकरण योजना चालवतेय. या योजनेंतर्गत कुंभारांना शासन इलेक्ट्रिक चॉक देते. अशा परिस्थितीत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन तुमच्या घरात इलेक्ट्रिक चॉकच्या मदतीने कुल्लड बनवू शकता.

कुल्हार नियमित कुल्लड विकलेत तर तुम्ही या व्यवसायाद्वारे दररोज 1,000 रुपयांपर्यंत सहज कमाई करू शकता. कुल्हार बनवण्याच्या या व्यवसायातून देशातील अनेकजण दरमहा हजारो रुपयांची कमाई करत आहेत. त्यामुळे तुम्ही लाडकी बहिण योजनेतून मिळालेल्या पैशांमधून हा साधा सोपा व्यवसाय सुरु करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

मुंबईतील 79 नगरसेवकांचं पद अडचणीत; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचेही बडे चेहरे अचडणीत

Exhaust Fan Cleaning Tips : एक्झॉस्ट फॅन घरच्या घरी कसा कसा स्वच्छ कराल? लगेचच वाचा टिप्स

कोट्यवधी लोक गरीबीच्या खाईत जाणार; पंतप्रधान मोदींचा मोठ्या संकटाचा इशारा

CSK ला पराभूत करत SRH नं मिळवलं प्लेऑफचं तिकीट; गुजरात टायटन्सचीही चांदी

SCROLL FOR NEXT