Scheme For Youth Saam Tv
बिझनेस

Scheme For Youth: पहिली नोकरी मिळताच सरकार देणार ₹१५०००, तरुणांसाठी १ लाख कोटींची योजना; PM मोदींची घोषणा

PM Modi Annoucemnet of New Scheme For Youth: पंतप्रधान मोदींनी आज लाल किल्ल्यावर मोठी घोषणा केली आहे. तरुणांसाठी नवीन १ लाख कोटी रुपयांची योजना सुरु केली आहे.

Siddhi Hande

आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी देशातील सर्व नागरिकांना संबोधले आले. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यांनी महिलांसाठी, तरुणांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी नवीन योजनांच्या घोषणा केल्या आहे. लखपती दीदी, स्वनिधी योजनेबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, तरुणांसाठी नवीन योजना सुरु केली आहे.

आज स्वातंत्र्यदिनाचा मूहूर्त साधत पीएम मोदींनी तरुणांसाठी घोषणा केली आहे. त्यांनी देशातील तरुणांना खुशखबर दिली आहे. पीएम मोदींना पंतप्रधान विकसित भारत योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे. यासाठी १ लाख कोटी रुपयांचा निधी वापरला जाणार आहे.आजपासून ही नवीन योजना सुरु झाली आहे.

कोट्यवधी तरुणांना या योजनेचा फायदा होणार आहे. ३.५ कोटी तरुणांना या योजनेमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी करणाऱ्या लोकांना सरकारकडून पैसे दिले जाणार आहेत. पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना १५,००० रुपये दिले जाणार आहेत.

पंतप्रधान मोदींनी सांगितले की, या योजनेअंतर्गत तरुणांना नवीन रोजगाराच्या संधी मिळतील. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना कार्यरत आहेत. महिलांसाठी लखपती दीदी योजना सुरु करण्यात आली आहे. यामुळे लाखो महिलांना मदत होणार आहे.

दिवाळीत सर्वसामान्यांना मिळणार गिफ्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीत सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा करणात आहे. यामध्ये नवीन जीएसटी सुधारणा आणणार आहेत. यामध्ये जीएसटी दराचा आढावा घेतला जाईल. यामुळे कर कमी होतील. जे खूप सोपे असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

EPFO सदस्यांसाठी खूशखबर, आता ATMमधून काढा पीफचे पैसे

Maharashtra Politics: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे अॅक्टिव्ह नवरात्रीचं कारण की निवडणुकीची रणनीती?

SCROLL FOR NEXT