PPF Scheme Saam Tv
बिझनेस

PPF Scheme: रोज १०० रुपये जमा करा अन् १० लाख कमवा; PPF योजनेत मिळतो सर्वाधिक परतावा; जाणून घ्या कॅलक्युलेशन

PPF Scheme: सरकारच्या पब्लिक प्रोव्हिडंट फंड या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनेत रोज १०० रुपये गुंतवून तुम्ही १० लाख रुपये मिळवू शकतात.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपापल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात.वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भविष्यात कधीच आर्थिक अडचण भासरणार नाही. तुम्ही पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये गुंतवणूक करु शकतात. पीपीएफ स्कीममध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. या योजनेत ७ टक्के व्याजदर मिळते.

पब्लिक प्रोव्हिडंट फंड या योजनेत रोज १०० रुपये गुंतवणूक करुन तुम्ही १० लाख रुपये मिळवू शकतो. या योजनेत कमीत कमी गुंतवणूकीत जास्त परतावा मिळतो.

पीपीएफ योजना ही एकदम सुरक्षित आहे. यात तुम्हाला निश्चित परतावा मिळतो. पीपीएफ योजनेतील अकाउंट १५ वर्षांनी मॅच्युअर होते. या योजनेत जर तुम्हाला अजून काही वर्षे गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही करु शकतात. या योजनेत खूप चांगले बेनिफिट मिळतात. या योजनेत तुम्हाला चक्रवाढ व्याजदेखील मिळते.

पीपीएफ योजनेत तु्म्ही वर्षाला ५०० रुपयांचीदेखील गुंतवणूक करु शकतात. एका वर्षात जास्तीत जास्त १.५० लाख रुपये गुंतवू शकतात. या योजनेत सध्या ७.१ टक्के व्याजदर मिळते. या योजनेत व्याजदर नेहमी बदलत असते. त्यामुळे तुम्हाला जास्त परतावादेखील मिळू शकतो.

या योजनेत तुम्हाला रोज १०० रुपये गुंतवायचे आहेत. जर तुम्ही रोज १०० रुपये गुंतवले तर महिन्याला ३००० रुपये गुंतवणार आहात. त्यामुळे वर्षाला तुम्ही ३६००० रुपये गुंतवणार आहे. १५ वर्षांच्या मॅच्युरिटी पीरियडपर्यंत तुम्ही ९,७६,३७० रुपये मिळणार आहे. यातील ५.४० लाख रुपये तुमची गुंतवणूक असणार आहे. त्यावर ४,३६,३७० रुपये व्याजदर मिळणार आहे.

पीपीएफ योजनेत पाच वर्षांसाठी गुंतवणूक केल्यावर तुम्हाला सर्वाधिक परतावा मिळतो. जर तुम्ही ही गुंतवणूक कायम केली तर तुम्हाला डबल रिटर्नदेखील मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT