Samsung Galaxy A34 5G Saam Tv
बिझनेस

Samsung 5 G: स्वस्त झाला सर्वाधिक विक्री होणारा Samsungचा 5G फोन; 'या' वेळेपर्यंत घेता येणार ऑफरचा लाभ

Samsung Galaxy A34 5G : Samsung India ने या स्मार्टफोनच्या किमतीमध्ये तीन हजार रुपयांचा सूट देण्यात आलीय. हा स्मार्टफोन जेव्हा लॉन्च झाला होता, तेव्हा याची किमत ३०,९९९ रुपये होती. मागील काही दिवसापासून हा स्मार्टफोन २६,४९९ रुपयांमध्ये मिळत आहे. या ऑफरनंतर हा फोन आता अजून स्वस्त झालाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Samsung Galaxy A34 5G Cashback Offer :

स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल तर Samsung कंपनीने तुमच्यासाठी आनंदाची बातमी दिलीय. Samsung कंपनीने आपला सर्वाधिक विकला जाणारा 5G स्मार्टफोन Galaxy A34 च्या किमतीत कपात केलीय. सॅमसंग इंडियाने या स्मार्टफोन खरेदीवर कॅशबॅक ऑफर देण्याची घोषणा केलीय. Galaxy A35 5G च्या लॉन्चच्या आधी यूझर्स या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. (Latest News)

स्वस्तात खरेदी करा Galaxy A34 5G

Samsung India ने या स्मार्टफोनच्या किमतीमध्ये तीन हजार रुपयांचा सूट देण्यात आलीय. हा स्मार्टफोन जेव्हा लॉन्च झाला होता, तेव्हा याची किमत ३०,९९९ रुपये होती. मागील काही दिवसापासून हा स्मार्टफोन २६,४९९ रुपयांमध्ये मिळत आहे. या ऑफरनंतर हा फोन आता २२,९९९ रुपयांत मिळत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा फोन तुम्ही खरेदी करणार असाल तर तुम्हाला तब्बल ३,५०० रुपयांची सूट मिळणार आहे. तर या फोनचा टॉप व्हेरिएंट २७,४९९ रुपयांमध्ये लॉन्च झाला होता. तो हॅण्डसेट आता २४,४९९ रुपया मिळत आहे. युझर्स सॅमसंगच्या अधिकृत ई-स्टोर, अॅपसह Amazon अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट Flipkart वर या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

जाणून घ्या फीचर्स

सॅमसंगच्या या स्मार्टफोनला ६.६ इंचचा SuperAMOLED डिस्प्ले देण्यात आलाय. या फोनचा डिस्प्ले FHD+ रिझोल्यूशनला सपोर्ट देतो. 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करत असतो. फोनचे डिस्प्ले कॉर्निग गोरिल्ला ग्लास 5प्रोटेक्शनने लेस आहे. हा फोन MediaTek Dimensity 1080 वर काम करतो. तर स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंतचे स्टोटेरेज देण्यात आले आहे.

तर या फोनमध्ये 8MP चा अल्ट्रा वाइड आणि 5MP चा माइक्रो कॅमेरा देण्यात आलाय. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात १३ मेगापिक्सेल चा कॅमेरा देण्यात आलाय. तर या स्मार्टफोनला 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

SCROLL FOR NEXT