UPI Rule News 
बिझनेस

UPI News: चुकूनही दुसऱ्याला जाणार नाही पैसे; UPI मध्ये होणार 'हा' मोठा बदल

UPI Rule News: नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया ३० जून २०२५ पासून युपीआयमधील व्यवहारांमध्ये मोठा बदल करणार आहे. कोणालाही पेमेंट करताना समोरील व्यक्तीचं बॅक व्हेरिफाइड नाव दिसणार आहे.

Bharat Jadhav

ऐका, तुम्ही बिल पेमेंट्स करण्यासाठी युपीआयचा वापर करताय का? हो, मग ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. युपीआय पेमेंट्स करताना अनेकांना आर्थिक फसवणूक होईल असा धाक वाटत असतो. परंतु आता युपीआय पेमेंट करताना कोणताच फ्रॉड किंवा स्कॅम होणार नाही. कारण तुम्ही दुसऱ्या कोणालाही युपीआय द्वारे पेमेट करत असला किंवा पैसे पाठवत असाल तर तुम्हाला आता बॅक व्हेरिफाइड नाव दिसणार आहे. आतापर्यंत फक्त नीकनेम इतर दुसरं नाव दिसत होतं.

जून महिन्याच्या ३० तारखेपासून नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडियाने एक नियम लागू करणार आहे. यासह युपीआय अॅप्सने पेमेंट करताना आधी नाव आणि बँक खातं कन्फर्म केलं जातं. त्यावेळी बँक व्हेरिफाइड नाव दाखवलं जाईल. या नियमामुळे पारदर्शकता वाढेल, आर्थिक फसवणूक कमी होईल,युझर्स सुरक्षित डिजिटल व्यवहारांची खात्री करू शकतील. आता पी टू पी आणि पी टू पीएम म्हणजेच पर्सन टू मर्चंट अशा या दोन्ही ट्रॉझक्शन मध्ये आता केवळ बँक द्वारे व्हेरिफाइड नाव आणि पेमेंट कन्फर्मेशन स्क्रीनवर दिसेल.

आधी युपीआय अॅप्समध्ये क्यूआर कोडवरून नाव घेतलं जात होत, युझर डिफाइंड उपनाव, किंवा मोबाईलमध्ये सेव्ह केलेले कॉन्टॅक्स नाव किंवा निकनेम दिसत होते. यातून स्कॅम होण्याची शक्यता होती. फसवणूक करणारे अनेकदा नावे कॉपी करून युझर्सची दिशाभूल करतात. आता सीबीएस-आधारित नावे प्रदर्शित करून ही समस्या दूर होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prasad Oak : प्रसाद ओकची गगन भरारी; अभिनेत्याच्या नावावर 2 विश्वविक्रमांची नोंद, शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Maharashtra Live News Update : पुणेकरांवरील 5 टक्क्यांवरील करवाढ रद्द

Shocking : धक्कादायक! सावत्र भावानेच नेलं बहिणीला पळवून; असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात

Aloe Vera Juice: घरी कोरफडचा रस कसा बनवायचा? सोपी आहे पद्धत

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! आज वाहतुकीत मोठे बदल, 'हे' आहेत पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT