Flipkart Republic Day Sale  Inc
बिझनेस

Republic Day Sale: १४ जानेवारीपासून सुरू होईल सेल, iPhone १५ सह या फोन्सवर मिळेल मोठी सूट

Bharat Jadhav

Flipkart Republic Day Sale:

फ्लिपकार्टचा १४ जानेवारीपासून प्रजासत्ताक दिनी सेल सुरू होणार आहे. कंपनीने आपल्या वेबसाइट आणि अॅप्सवर या सेलची झलक दाखवलीय. या टीझरमध्ये तुम्ही पाहिलं असेल मोठं-मोठ्या कंपन्यांचे स्मार्टफोन्सची किमत कमी झालीय. मोबाईल्सच्या किमतीवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आलीय. टीझर पेजवर दाखवल्याप्रमाणे हा सेल १९ जानेवारीपर्यंत चालणार आहे. (Latest News)

या फोनवर बंपर डिस्काउंट

फ्लिपकार्टने अद्याप सर्व फोनच्या किमती जाहीर केलेल्या नाहीत. मात्र कोणते फोन स्वस्तात मिळतील हे सांगितले आहे. या सेलमध्ये Apple च्या सर्व iPhone 15, 14, 13, 12 वर डिस्काउंट असेल. तसेच Google Pixel 7a, Samsung Galaxy S21 FE 5G, Motorola Edge 40 Neo, Samsung Galaxy S22, Pixel 8, Vivo T2 Pro, Oppo Reno 10 Pro, Vivo T2x, Poco X5, Realme 11, Redmi 12, Samsung Galaxy F34 5G आणखी बरेच फोन कमी किमतीत उपलब्ध असणार आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आयफोन १५ ची मोठी डिमांड

हा सेल सुरू होण्यासाठी अजून काही दिवस बाकी आहेत. पण फ्लिपकार्ट १४ जानेवारीपूर्वी किंमती जाहीर करेल, अशी शक्यता आहे. या सेलमध्ये iPhone 15 सारखे फोन्सची किमत कमी करण्यात आलीय. यामुळे आयफोन लव्हर्ससाठी हा सेल आनंदाचा असणार आहे. सेल सुरू होण्यापूर्वीच बेस 128GB स्टोरेज मॉडेल फ्लिपकार्टवर ७२,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. सुरुवातीला भारतात आयफोन १५ किमत ७९,९९० रुपये होते. या सेलमध्ये ग्राहकांना या फोनच्या किमतीमध्ये तब्बल ६,९०१ रुपयांची सूट मिळू शकते.

Amazon Republic Day Sale Amazon प्रजासत्ताक दिन सेल

दरवर्षाप्रमाणे यावेळी देखील फ्लिपकार्टसह Amazon नेही प्रजासत्ताक दिनी सेल ऑफर ठेवलीय. दरम्यान सेल कधी सुरू होणार आहे याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीये. पण सवलतीच्या फोनची यादी जाहीर करण्यात आलीय. Amazon वर iPhone 13 वर सूट देण्यात आलीय. त्यामुळे त्यावर नक्कीच सूट मिळेल. OnePlus Nord CE 3 Lite, Redmi 12, Galaxy S23, OnePlus 11R सारखे फोन देखील स्वस्तात मिळतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT