Reliance Jio Recharge Plans Saam Tv
बिझनेस

5G डेटासह एक वर्षासाठी 14 OTT मोफत; प्रतिदिन फक्त 12 रुपये खर्च, 44 कोटी ग्राहकांना मिळणार फायदा

साम टिव्ही ब्युरो

Reliance Jio Recharge Plans:

देशात रिलायन्स जिओकडे सर्वाधिक 44 कोटी ग्राहक आहेत. ग्राहकांच्या गरजेनुसार कंपनीचे विविध प्रकारचे प्रीपेड प्लान ऑफर करते. जर तुम्हाला चित्रपट आणि वेब सिरीज पाहायची आवड असेल तर कंपनीने तुमच्यासाठी एक जबरदस्त प्लान आणला आहे.

आम्ही ज्या प्लॅनबद्दल बोलत आहोत, त्यामध्ये प्राइम व्हिडिओ, जिओसिनेमा प्रीमियम आणि डिस्ने + हॉटस्टारसह सर्व 14 OTT सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी मोफत उपलब्ध असतील. यात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे प्लानचा रोजचा खर्च सुमारे 12 रुपये असेल. या पैसा वासूल प्लानबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिओचा 4498 रुपयांचा प्रीपेड प्लान

जिओने नुकताच 4498 रुपयांचा प्रीपेड प्लान लॉन्च केला आहे. हा प्लान 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. याची किंमत आणि वैधता पाहिल्यास, या प्लानचा प्रतिदिन खर्चसुमारे 12 रुपये असेल. या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळेल म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान एकूण 730GB डेटा उपलब्ध असेल. असं असलं तरी हा 4G डेटा आहे आणि डेटा मर्यादा संपल्यानंतरही ग्राहक 64Kbps स्पीडने इंटरनेट वापरू करू शकतात.  (Latest Marathi News)

मात्र जर तुमच्या भागात Jio चे 5G नेटवर्क उपलब्ध असेल आणि तुमच्याकडे 5G फोन असेल, तर तुम्ही अमर्यादित 5G डेटा वापरू शकाल. या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत. या प्लानचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामध्ये उपलब्ध असलेले OTT चे फायदे.

14 OTT सबस्क्रिप्शन पूर्णपणे मिळणार मोफत

दरम्यान या प्लानमध्ये एकूण 14 OTT सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहेत. ज्यामध्ये 1 वर्षासाठी Prime Video Mobile Edition, 1 वर्षासाठी JioCinema Premium, 1 वर्षासाठी Disney+Hotstar Mobile यांचा समावेश आहे . यासोबतच Sony LIV, ZEE5, Lionsgate Play, Discovery+, Sun NXT, Kanchha Lanka, Planet Marathi, Chaupal, Docubay, EPIC ON आणि Hoichoi यांचाही समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

National Park: प्राणी प्रेमींनो! भारतातील 'ही' राष्ट्रीय उद्याने पाहिलीत का?

Jammu Kashmir Exit Polls : जम्मू-काश्मीरमध्ये येणार 'इंडिया आघाडी'चं सरकार, भाजपला बसणार धक्का? जाणून घ्या EXIT POLL चा अंदाज

Marathi News Live Updates :हरियाणात १० वर्षांनंतर काँग्रेस रिटर्न, जम्मूत भाजपची सत्ता; एक्झिट पोलचे आकडे आले

Navratri 2024: देवीला दाखवा हा नैवेद्य; इच्छा होतील पूर्ण

Haryana Election Exit Poll : हरियाणात १० वर्षांनंतर काँग्रेसचं सरकार? भाजपची हॅट्ट्रिक हुकणार, जाणून घ्या Exit Poll चे अंदाज

SCROLL FOR NEXT