Realme C73 5G Features Saamtv
बिझनेस

Realme C73 5G भारतात कधी होणार लॉन्च; काय आहे आहेत फीचर्स,किंमत जाणून घ्या

Realme C73 5G Features: स्मार्टफोन कंपनी रिअल कंपनी आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलीय. कंपनी लवकरच स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

Bharat Jadhav

भारतीय बाजारात अनेक स्मार्टफोन लॉन्च केले जाताहेत. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. वाचक मित्रांनो लवकरच Realme एक नवीन फोन लॉन्च करणार आहे. Realme ने Realme C73 5G भारतात कधी लॉन्च होणार याची तारीख जाहीर केली आहे. Realme पुढील आठवड्यात भारतीय बाजारात हा स्मार्टफोन लॉन्च होऊ शकतो असं सांगण्यात येत आहे.

जर तुम्ही कमी बजेटवाला पण टिकाऊ स्मार्टफोन शोधत असाल तर तुम्ही Realme C73 5G चा पर्याय निवडू शकता. Realme नुसार, Realme C73 5G २ जून २०२५ रोजी लॉन्च होईल. हा स्मार्टफोन बाजारात Xiaomi, Redmi, Vivo, Oppo आणि Samsung च्या स्मार्टफोन्सना कडक टक्कर देईल.

Realme C73 5G मध्ये तुम्हाला मोठी बॅटरी मिळेल. जर तुम्ही असा स्मार्टफोन शोधत असाल ज्यात मोठी बॅटरी असेल तर हा फोन तुमच्यासाठी योग्य आहे. या मोबाईलचं सर्वात मोठं वैशिष्ट्ये हे बॅटरीच आहे. इतर मोबाईलपेक्षा या मोबाईलमध्ये अधिक उत्तम देण्यात आलीय. त्यामुळेच कंपनीने सोशल मीडियावर या मोबाईलचा प्रचार करताना बॅटरीचं वैशिष्ट्ये दाखवलंय.

त्यासाठी कंपनीने या आगामी स्मार्टफोनचा सोशल मीडियावर टीझ हा 'इंडिया का बॅटरी चॅम्पियन' या टॅगलाइनने दिलाय. Realme C73 5G मध्ये, तुम्हाला 6000mAh ची मोठी बॅटरी मिळेल, जी एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण दिवस सहज चालेल.

Realme C73 5G चे फीचर्स काय आहेत

Realme C73 5G मध्ये 6.78-इंचाचा HD डिस्प्ले उपलब्ध असणार आहे.

लॅग फ्री वर्कसाठी, त्याच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ असेल.

रियलमी हा स्मार्टफोन जांभळा, हिरवा आणि काळा रंग पर्यायांसह लाँन्च केला जाईल.

या फोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी मिळेल जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

या स्मार्टफोनमध्ये MediaTek 6300 चा प्रोसेसर दिलं जाईल. Realme C73 5G मध्ये तुम्हाला 8GBचा रॅम आणि 128GB स्टोरेज मिळेल.

फ्लिपकार्ट लिस्टिंगनुसार, Realme C73 5G मध्ये अनेक आकर्षक फीचर्स असतील. हा फोन क्रिस्टल पर्पल, जेड ग्रीन आणि ओनिक्स ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल.

या फोनमध्ये डोळ्यांना आराम देणारा डिस्प्ले मिळेल.

या फोनमध्ये कोणता कसा कॅमेरा असेल याची माहिती अद्याप समोर आली नाहीये. परंतु 32MP प्राइमरी सेन्सर आणि 8MP सेल्फी कॅमेरा या मोबाईलमध्ये असेल असं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT