RBI FD Rules Meta ai
बिझनेस

FD Rules 2026 : FD करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 1 ऑक्टोबरपासून RBI चा नवा नियम; फायदा की तोटा होणार?

Fixed Deposit : RBI ने FD व्याजदरांबाबत नियम जाहीर केले आहेत. १ ऑक्टोबर २०२६ पासून पारदर्शकता वाढणार असून, समान अटींच्या ठेवींना समान दर मिळायला मदत होईल.

Sakshi Sunil Jadhav

तुम्ही बचतीची रक्कम फिक्स्ड डिपॉझिट (FD) मध्ये गुंतवण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने बँक ठेवींवरील व्याजाच्या दराशी संबंधित नियमांमध्ये बदल केले असून, हे नवे नियम १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणार आहेत. या बदलांचा मुख्य उद्देश FD वरच्या व्याजजरांमध्ये जास्त पारदर्शकता आणणं आणि ग्राहकांना समान संधी मिळवून देणं हा आहे.

समान अटींवर वेगळा व्याजदर देता येणार नाही

नव्या नियमांनुसार, एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये ग्राहकांना समान अटींवर वेगवेगळे FD व्याजदर देण्याची शक्यता कमी होणार आहे. उदाहरणार्थ, दोन ग्राहकांनी समान दिवशी, समान रक्कम, समान कालावधी आणि समान अटींवर FD केली, तर फक्त शाखा किंवा शहर वेगळं असल्यामुळे त्यांना वेगवेगळं व्याजदर देता येणार नाहीत. यामुळे FD करणाऱ्या सामान्य ग्राहकांना अधिक समान आणि पारदर्शक व्याजदर मिळायला मदत होऊ शकते.

बँकेच्या वेबसाइटवर व्याजदरांची माहिती

नव्या नियमांनुसार बँकांना त्यांच्या FD वर लागू असलेल्या व्याजदरांची माहिती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून द्यावी लागेल. त्यामुळे ग्राहकांना शाखेत जाण्याआधीच वेगवेगळ्या कालावधी आणि ठेवींच्या रकमेवरील व्याजदर पाहता येतील. यामुळे विविध बँकांच्या FD योजनांची तुलना करणंही सोपं होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha: पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करावे की नाही?

आमदार मेहतांची मुजोरी संपेना, 'मिरा-भाईंदर ही जैनांची नगरी'

भारतावर संसर्गजन्य कॅन्सरचं संकट, 23 लाख रुग्णांना व्हायरल कॅन्सर

लाडकी बहीण योजनेवर टांगती तलवार? महिलांचं टेंन्शन वाढलं

सुनिल तटकरेंना कोण करतंय टार्गेट? बड्या नेत्याच्या विधानाने राष्ट्रवादीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT