Ration Card meta ai
बिझनेस

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

Ration Card Update: १ ऑक्टोबर २०२६ पासून SMART-PDS अंतर्गत Silent Ration Card आणि Duplicate Beneficiary यांची पडताळणी होऊ शकते. रेशन कार्डधारकांनी e-KYC पूर्ण करून कार्डाची स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे.

Sakshi Sunil Jadhav

रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता रेशन कार्डाच्या व्यवस्थेत सरकारने नवीन व्यवस्था लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील (PDS) नोंदी जास्त अचूक आणि अपडेट करण्यासाठी ही व्यवस्था लागू केली जाईल. १ ऑक्टोबर २०२६ पासून SMART-PDS प्रणालीमध्ये ‘Silent Ration Card’ आणि ‘Duplicate Beneficiary’ यांची तपासणी करण्यासाठी नवीन SOP लागू होणार आहे. त्यामुळे काही रेशन कार्ड तात्पुरते निष्क्रिय केली जाऊ शकतात. मात्र १ ऑक्टोबरपासून सर्व रेशन कार्ड बंद होतील, असं अजिबात नाही.

ज्या रेशन कार्डावर मागच्या सहा महिन्यांपासून रेशन घेतलेले नाही, अशी कार्डे तपासणीच्या कक्षेत येऊ शकतात. अशा कार्डांना ‘Silent Ration Card’ मानलं जाऊ शकतं. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचं नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी लाभार्थी म्हणून आढळलं तर ‘Duplicate Beneficiary’ म्हणून त्याची पडताळणी केली जाईल.

महत्त्वाचं म्हणजे, रेशन कार्ड तात्काळ आणि कायमचं रद्द केलं जाणार नाही. संबंधित लाभार्थ्याला आपली पात्रता आणि ओळख सिद्ध करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला जाईल. या काळात e-KYC, कागदपत्रांची तपासणी आणि आवश्यक असल्यास Field Verification केलं जाऊ शकतं. पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाईल.

सरकारी माहितीनुसार, ३० जुलै २०२६ पर्यंत देशातल्या ९०.६४ टक्के e-KYC पूर्ण झाली होती. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांची e-KYC अद्याप बाकी आहे, त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करून घेणं महत्त्वाचं आहे. ही प्रोसेस संबंधित स्वस्त धान्य दुकानातल्या ePOS मशीनच्या माध्यमातून करता येते.

त्यामुळे रेशन कार्डधारकांनी आपल्या कार्डाची स्थिती तपासा, e-KYC पूर्ण आहे की नाही हे पाहावी आणि बराच काळ रेशन घेतलं नसेल तर संबंधित विभागाशी संपर्क साधावा. १ ऑक्टोबरपासून सर्व रेशन कार्ड बंद होणार असल्याचा चुकीचा दावा असून, ही कारवाई निष्क्रिय आणि डुप्लिकेट लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT