Business News Saam Digital
बिझनेस

Business News: इतके महिने गुंतवणूक करा अन् दुप्पट मिळवा, पोस्टाच्या योजनेला प्रचंड प्रतिसाद

Business News: पोस्टाने पोस्ट ऑफिस डिपॉझिट योजना सुरू केली आहे. तुम्ही जर गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या योजनेत गुंतवणूक केलेली रक्कम निश्चित वेळेत दुप्पट होते आणि सुरक्षितही राहते

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Business News

गुंतवणूक केलेले पैसे सुरक्षित राहावेत आणि भविष्यात योग्य रक्कम मिळावी अशी प्रत्येक गुंतवणूकदाराची अपेक्षा असते. यासाठी अनेक पर्याय निवडले जातात. याचा विचार करून सध्या पोस्टाने पोस्ट ऑफिस डिपॉझिट योजना सुरू केली आहे. तुम्ही जर गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या योजनेत गुंतवणूक केलेली रक्कम निश्चित वेळेत दुप्पट होते आणि सुरक्षितही राहते. सध्या या योजनेला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

ग्राहकांच्या गुंतवणुकीवर बँकांपेक्षाही जास्त व्याज दिलं जात आहे. सरकार या योजनेतंर्गत ७.५ टक्के व्याज देत आहे. वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येऊ शकते. एका वर्षाच्या गुंतवणुकीवर ६.९ टक्के व्याज, २ आणि ३ वर्षांसाठी ७ टक्के आणि ५ वर्षाच्या गुंतवणुकीवर ७.५ टक्के व्याज मिळणार आहे. मात्र, गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट होण्यासाठी ५ वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागतो.

पोस्ट कार्यालयात या योजनेंतर्गत १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाचं खातं उघडता येतं. किमान १ हजार रुपयांमध्ये सिंगल किंवा जॉईंट अकाउंट उघडता येतं. या खात्यात जमा केलेल्या रकमेवर व्याजाची रक्कम वार्षिक आधारावर मिळणार आहे.

गुंतवणूक केलेल्या रकमेवर ७. ५ टक्के व्याज मिळणार आहे मात्र जर टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणून केली तर अधिक परतावा मिळणार आहे. ही रक्कम ११४ महिन्यांनी म्हणजेच ९. ६ वर्षांनी दुप्पट होईल. या योजनेत गुंतवणूक केलेल्या ग्राहकांना भारत सरकारकडून आयकर विभागामार्फत सवलतीही देण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

SCROLL FOR NEXT