आपलं भविष्य सुरक्षित राहावं यासाठी बॅका हा सगळ्यांनाच सुरक्षित पर्याय वाटत असतो.पण कष्टानं कमावलेला पैसा जर बॅकेतून एका झटक्यात गायब झाला तर... चक्रावलात. ही बातमी एका... पंजाब नॅशनल बँकेत (PNB) अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. बँकेच्या अनेक ग्राहकांच्या ठेवींतून तब्बल 35 कोटी रुपये गायब झाल्याचं समोर आलंय. महत्त्वाचं म्हणजे, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बँक व्यवस्थापकासह काही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडातल्या शाखेत हा प्रकार घडलाय..मात्र, कोणतीही पूर्वकल्पना, मेसेज तसंच स्वाक्षरी नसताना पैसे गायब कसे झाले..
एकीकडे बॅंकातून पैसे गायब होत आहेत तर दुसरीकडे डिजिटल अरेस्टसारख्या घटनांमध्येही मोठी वाढ झालीये. याच पार्श्वभूमीवर, डिजिटल अरेस्ट आणि वित्तीय सायबर घोटाळ्यांची स्वतःहून गंभीर दखल घेत सुप्रीम कोर्टानं एका याचिकेवर सुनावणी घेतलीये. यावेळी कोर्टानं RBIच्या नियम अधिक कडक करण्याची सूचना केली आहे.
RBIच्या नियमांत तरतुदीची सूचना - HDR
डिजिटल अरेस्ट प्रकरणात बँका जबाबदार असल्यास पीडितांना किमान नुकसान भरपाई द्यावी
RBIच्या नियमांत नुकसान भरपाई, बाहेरील हस्तक्षेप रोखणं, संस्थेचे उत्तरदायित्व यांचा समावेश करावा
नियमांना मंजुरी देण्यापूर्वी प्रस्तावित KYC सुधारणा निर्देशांची कोर्ट तपासणी करणार
विशेष म्हणजे, गेल्या 8 महिन्यांत डिजिटल अरेस्टच्या 21 हजार 900 हून अधिक तक्रारी समोर आल्या असून 674 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झालीये. या वाढत्या प्रकरणांमुळेही आता देशभरातील बँका कोर्टाच्या रडारवर आल्यात. तर दुसरीकडे, ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये बँकांतून लंपास होत असतील तर सामान्य ग्राहकांनी पैसे नेमके ठेवायचे तरी कुठे?... हाच खरा सवाल आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.