Rice  saam tv
बिझनेस

Bharat Rice: मोदी सरकारची 'भारत राईस योजना', नागरिकांना अवघ्या २९ रुपयात मिळणार तांदूळ

Bharat Rice Scheme: देशात महागाई वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत आहेत. देशात तांदळाच्या किरकोळ किंमतीत वाढ होत आहे. त्यामुळेच आता केंद्र सरकारकडून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अवघ्या २९ रुपयांना तांदूळ मिळणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bharat Rice Scheme Get Rice At 29 Kg Rupees:

देशात महागाई वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत आहेत. देशात तांदळाच्या किरकोळ किंमतीत वाढ होत आहे. त्यामुळेच आता केंद्र सरकारकडून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकार आजपासून देशात भरात राईस (India Rice) आणणार आहे.

देशातील वाढत्या महागाईच्या काळात सरकारने नागरिकांसाठी हा निर्णय घेतला आहे. त्यात तांदूळ २९ रुपये प्रति किलो दराने विकला जाणार आहे. हा अनुदानित तांदूळ ५ किलो आणि १० किलोंच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना कमी किंमतीत चांगला तांदूळ मिळणार आहे.  (Latest News)

पीटीआयच्या अहवालानुसार, एका वर्षात तांदळाच्या किरकोळ किंमतीत तब्बल १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता स्वस्त भारत डाळ, स्वस्त भारत आटानंतर आता स्वस्त तांदूळ बाजारात येणार आहे. केंद्रिय अन्न मंत्री पियुष गोयल आज ६ फेब्रुवारीला दिल्लीतील कर्तव्यपथावर भारत राईस सादर करणार आहेत.

भारतीय खाद्य निगम (FCI) यासाठी दोन सहकारी संस्था नॅशनल अॅग्रिकल्चरल को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघसोबत भागीदारी केली आहे. जवळपास ५ लाख तांदूळ या योजनेअंतर्गत विकला जाणार आहे. हा तंदूळ ५ आणि १० किलोंच्या पॅकिंगमध्ये विकला जाईल. त्याची किंमत २९ रुपये प्रति किलो आहे.

NAFED आणि NCCF च्या माध्यमातून भारत आटा २७.५० रुपये प्रति किलो रुपयांना विकला जात आहे. तर डाळ ६० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. त्यानंतर आता भारत राईस कमी किंमतीत विकला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारचे हे महत्त्वाचे पाऊल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कल्याणमध्ये भाजप-शिंदेसेना संघर्ष! आनंद दिघे पुलावरुन श्रेयवाद रंगला|VIDEO

लग्न झालं अन् सासरी निघाली, वाटेतच नवरी गायब; नवरा डोक्याला हात लावून बसला, नेमकं काय घडलं?

Pune: फोडलेला नारळ, लिंबू, हदळ-कुंकू अन्...; घरासमोर जादूटोण्याचा प्रकार; घटनेचा सीसीटीव्ही VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: शिंदे यांच्या शिवसेनेकडून नाशिकच्या तपोवनात आंदोलन सुरू

राज्यातील इतर पक्षही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यानेच चालतात; भाजप मंत्र्याचा रोख कुणाकडे? VIDEO

SCROLL FOR NEXT