PM Matru Vandana Scheme Saam Tv
बिझनेस

PM Matru Vandana Scheme: गरोदर महिलांसाठी सरकारची खास योजना! मिळणार ६ हजार रुपयांची मदत; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

PM Matru Vandana Scheme Benefits: सरकारने गरोदर महिलांसाठी खास योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना ६००० रुपयांची मदत मिळणार आहे.

Siddhi Hande

सरकार नेहमीच नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतात. भारत सरकारच्या महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत. सरकारने महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. यातीलच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृत्व योजना. प्रधानमंत्री मातृत्व योजनेत सरकार गरोदर महिलांना आर्थिक मदत करते.

प्रधानमंत्री मातृत्व योजनेअंतर्गत गरोदर महिलांना सरकार ६ हजार रुपयांची आर्थिक मदत करते. गर्भवती महिलांची योग्य पद्धतीने काळजी न घेतल्याने त्यांचे होणारे बाळ कुपोषित राहतात. त्यांना अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी घेण्यासाठी ही आर्थिक मदत करण्यात येत आहे. गर्भवती महिला आणि त्यांच्या बाळांना सृदृढ आणि चांगले पोषण मिळावे, यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

भारत सरकारने १ जानेवारी २०१७ रोजी या योजनेची सुरुवात केली आहे. पीएम मातृत्व वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी गरोदर महिलेचे वय १९ पेक्षा जास्त असावे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

पीएम मातृत्व वंदना योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना तीन हप्त्यांमध्ये ६ हजार रुपये दिले जातात. यात पहिल्या टप्प्यात १ हजार रुपये दिले जातात. त्यानंतर दोन टप्प्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जातात. त्यानंतर महिलांना हॉस्पिटलतर्फे दिले जातात.

या योजनेत पैसे महिलांच्या बँक अकाउंटला जमा होतात. याबाबत अधिक माहिती https://web.umang.gov.in/landing/department/pmmvy.html या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khopoli Hill Station : पावसाळी पिकनिकसाठी परफेक्ट! खोपोलीपासून हाकेच्या अंतरावर वसलंय स्वर्गाहून सुंदर हिल स्टेशन

Om Bhutkar wedding: मराठमोळ्या अभिनेत्याने गुपचुप उरकलं लग्न?; बायकोसोबतचा पहिला फोटो आला समोर

e-challan : तुम्हाला चुकून ई-चालान आलंय, ऑनलाइन कॅन्सल करता येईल का आणि ते कसं ? वाचा सविस्तर

Shirdi Sai Baba : शिर्डीला दर्शन घ्यायला जाताय? VIP दर्शन महागलं, आता किती रूपयांना मिळणार पास?

माजी मुख्यमंत्र्यांना पुन्हा मोठा धक्का! 3 माजी खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT