PM Kisan Yojana  meta ai
बिझनेस

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीएम किसानच्या २४व्या हप्त्याचे २,००० कधी जमा होणार?

PM Kisan 24th Installment Update: पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता शेतकरी २,००० रुपये कधी येणार याची वाट पाहत आहेत.

Sakshi Sunil Jadhav

शेतकऱ्यांना यंदा दुष्काळाचा सामना करावा लागतोय. कमी पावसामुळे शेतीची चांगली वाढ झाली नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अशावेळेस काही सरकारी योजनांकडून मिळणारा निधी शेतकर्‍यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी पीएम किसान योजनेच्या निधीची वाट पाहतायेत. या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी ६,००० रुपये तीन समान हप्त्यांमध्ये जमा केले जातात. प्रत्येक हप्त्यात २,००० रुपये दिले जातात. आता पुढचा हप्ता दिवाळीआधी मिळणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पण २४व्या हप्त्याची तारीख केंद्र सरकारकडून अधिकृतपणे जाहीर झालेला नाही.

पीएम किसानचा २४वा हप्ता कधी जमा होणार?

पीएम किसान योजनेचा २३वा हप्ता २० जून २०२६ रोजी जारी करण्यात आल्याची माहिती आहे. साधारण चार महिन्यांच्या अंतराने हप्ते वितरित होतात, असं गृहीत धरल्याने ऑक्टोबर २०२६ मध्ये पुढील हप्ता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काही माध्यमांच्या वृत्तांमध्ये दसऱ्यानंतर आणि दिवाळीआधी पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र ही फक्त शक्यता आहे. सरकारने अधिकृत तारीख जाहीर केलेली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही निश्चित तारखेवर विश्वास ठेवू नये. अधिकृत माहितीसाठी https://pmkisan.gov.in या वेबसाईटवर भेट द्यावी.

हप्ता मिळण्यासाठी ही कामं पूर्ण करा

२४व्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढची महत्त्वाच्या गोष्टी तपासून घ्याव्यात.

ई-केवायसी - पीएम किसान योजनेची ई-केवायसी प्रोसेस पूर्ण असणं आवश्यक आहे.

आधार-बँक खातं लिंक - बँक खातं आधारशी जोडलेले आहे का आणि आवश्यक बँक सीडिंग पूर्ण आहे का, हे तपासा.

जमिनीची पडताळणी - जमिनीशी संबंधित नोंदींचे व्हेरिफिकेशन पूर्ण असल्याची खात्री करा.

लाभार्थी स्टेटस - पोर्टलवर आपली माहिती आणि हप्त्याची स्थिती तपासा.

पीएम किसानचा स्टेटस कसा तपासायचा?

सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा. पुढे ‘Know Your Status’ हा ऑप्शन निवडा. आवश्यक माहिती भरून आपला लाभार्थी स्टेटस तपासा. ई- केवायसी किंवा जमिनीच्या पडताळणीत त्रुटी असल्यावर त्या दुरुस्त करून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरे गटावर निलेश राणेंची टीका; दोन ठाकरे एकत्र आले तरी राजकीय फरक पडणार नाही

भुजिया खरेदीसाठी ट्रेनमधून उतरला अन् थेट पोलिसांच्या... टायगर श्रॉफ प्रकरणाची थरारक इनसाइड स्टोरी

Raw Vs Roasted Pumpkin Seeds: कच्चा की भाजलेल्या, कोणत्या भोपळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर

महापालिकांचे आयुक्त बदलले! IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

Health Tips : एकाच वेळी अतिप्रमाणात पाणी प्यायलं तर शरीरात नक्की काय घडतं? आरोग्यासाठी चांगलं की वाईट?

SCROLL FOR NEXT