PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दिवाळीनंतर पीएम किसान योजनेचा हप्ता येणार; समोर आली अपडेट

PM Kisan Yojana 21st Installment: पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. पीएम किसान योजनेचा हप्ता दिवाळीनंतर येण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

पीएम किसान योजनेचा लाभ कधी मिळणार?

दिवाळीनंतर पैसे खात्यात येण्याची शक्यता

पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना दर तीन महिन्यांनी २००० रुपये दिले जातात. दरम्यान, अद्याप या योजनेचा २१वा हप्ता जमा झालेला नाही. लवकरच पैसे जमा केले जातील, असं सांगण्यात येत आहे. दिवाळीत शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा केले जातील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. दरम्यान, आता हा हप्ता लांबणीवर जाणार आहे.

पीएम किसान योजनेत शेवटचा हप्ता ऑगस्ट महिन्यात देण्यात आला होता. हा हप्ता लांबणीवर गेला होता. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पैसे जमा होण्याची शक्यता होती. मात्र, दिवाळीला सुरुवात झाली असूनही पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे नक्कीच हा हप्ता दिवाळीनंतर दिला जाईल.

काही राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आधीच पैसे जमा (PM Kisan Yojana Installment Recieve)

पीएम किसान योजनेत काही शेतकऱ्यांच्या खात्यात आधीच पैसे जमा करण्यात आले आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडमधील शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा झाले आहेत. या राज्यातील शेतकऱ्यांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्यांना आधीच पैसे देण्यात आले. लवकरच इतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.

पीएम किसान योजनेसाठी केवायसी अनिवार्य (PM Kisan Yojana KYC Mandatory)

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला केवायसी अनिवार्य आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने केवायसी करु शकतात. तुम्हाला फक्त अधिकृत वेबसाइटवर जाऊन मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल. तो ओटीपी टाकल्यावर तुमचे केवायसी पूर्ण होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सच्या संघात होणार मोठा बदल; कोण बनणार MIचा पुढचा कर्णधार? 'या' खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा

Maharashtra News Live Update: पाच हजार रुपयांची मदत म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं- नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात

किचनमधील भांड्यांचा तुमच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या

रात्री नुडल्स खाऊन कुटंब झोपलं अन्....; ५ जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट

Monday Horoscope: या 5 राशींचं नशीब पालटणार? अचानक पडणार पैशांचा पाऊस

SCROLL FOR NEXT