PF Deposit Last Date Today  saam tv
बिझनेस

PF Update: आजच पीएफ जमा करण्याची शेवटची संधी! कंपनीने केली चूक तर व्याजासह भरावा लागणार मोठा दंड

PF Deposit Last Date Today : EPFO ने ऑक्टोबर २०२६चा पीएफ जमा करण्यासाठी १५ नोव्हेंबर अंतिम तारीख ठरवली आहे. मुदत चुकल्यावर कंपन्यांना व्याज आणि दंड भरावा लागू शकतो.

Sakshi Sunil Jadhav

तुम्ही खासगी कंपनीत नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. ऑक्टोबर २०२६ महिन्याचा पगार आणि पीएफ जमा करण्याची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी कंपन्यांकडे आज शेवटची संधी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कंपन्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत पीएफचे पैसे आणि इलेक्ट्रॉनिक चलान-कम-रिटर्न (ECR) जमा करायला सांगितले. मुदतीत ही प्रोसेस केली नाही तर संबंधित कंपन्यांना व्याज आणि दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे कंपन्यांनी वेळेत हे काम पूर्ण करणं महत्त्वाचं आहे.

पीएफ जमा करण्याची आज शेवटची तारीख

खासगी कंपन्यांना ऑक्टोबर २०२६ च्या पगारातल्या कर्मचाऱ्यांचा आणि कंपनीचा पीएफमधला हिस्सा १५ नोव्हेंबरपर्यंत जमा करावा लागेल. यासोबतच ECR दाखल करणंही गरजेचं आहे. वेळेत पीएफ जमा केल्यावर कंपन्यांना जास्त आर्थिक भार सहन करावा लागणार नाही. तसेच कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यातही रक्कम वेळेवर जमा होईल.

ECR म्हणजे नेमकं काय?

ECR म्हणजे इलेक्ट्रॉनिक चालान-कम-रिटर्न. ही कंपन्यांकडून दर महिन्याला EPFO कडे सादर केली जाणारी माहिती आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचे नाव, पगार, पीएफमधले योगदान आणि जमा होणाऱ्या रकमेचा तपशील दिलेला असतो. ECR भरताना सर्व माहिती अचूक असणं महत्त्वाचं आहे.

फक्त ECR भरून चालणार नाही

कंपन्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फक्त ECR दाखल करून पीएफची प्रोसेस पूर्ण होत नाही. ECR दाखल केल्यानंतर संबंधित पीएफची रक्कमही EPFO कडे जमा करावी लागते. या दोन्ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात पीएफचे योगदान जमा होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सकाळी नाश्त्यानंतर प्या घरगुती आवळ्याचा ज्यूस: चवीसह आरोग्याला मिळतील भन्नाट फायदे! रेसिपी आत्ताच लिहून घ्या

Maharashtra News Live Update: 2029 पंढरपूरमध्ये विहिरीचा कठडा कोसळून अपघात, चार मजूर अडकल्याची भीती

Ramayana Box Office: बॉक्स ऑफिसवर 'रामायण'चा महाधमाका; १,२२८ कोटींची बंपर कमाई, 'या' सुपरहिट चित्रपटांना टाकले मागे!

Latur Bank Election: अपहरणाच्या आरोपांनंतर काँग्रेसची सावध भूमिका, मतदारांना बसने थेट मतदान केंद्रावर आणले

8th Pay Commission: १ जानेवारी २०२६ पूर्वी रिटायर झालात? मग ८व्या वेतन आयोगाचा फायदा मिळणार की नाही? लगेचच घ्या जाणून

SCROLL FOR NEXT