Petrol Diesel Rate  Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Rate : जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना दिलासा; वाचा पेट्रोल-डिझेलच्या तुमच्या शहरातील किंमती

Petrol Diesel Price (1 June 2024) : आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती देखील सकाळीच जाहीर झाल्यात. त्यामुळे आज मुंबई-पुणे या शहरांसह राज्यातील विविध शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत ते जाणून घेऊ.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दररोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्या कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर करतात. त्यानुसार प्रत्येक शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरत असतात. अशात आज जून महिन्याचा पहिलाच दिवस आहे. आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती देखील सकाळीच जाहीर झाल्यात. त्यामुळे आज मुंबई-पुणे या शहरांसह राज्यातील विविध शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत ते जाणून घेऊ.

सकाळी घरातून बाहेर पडताना प्रत्येक व्यक्तीने आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत ते तपासले पाहिजेत. आजच्या किंमती सामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या आहेत. कारण आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये काहीच बदल झालेला नाही. आजचे दर कालच्या दरांप्रमाणेच आहेत.

मुख्य शहरांमधील पेट्रोलच्या किंमती

दिल्लीमध्ये आज पेट्रोल ९२,७२ रुपये प्रति लिटर आहे.

कोलकत्तामध्ये आज पेट्रोल १०३.९४ रुपये प्रति लिटर इतका दर आहे.

चेन्नईमध्ये आज पेट्रोल १००.८६ रुपये प्रति लिटर आहे.

तर पटनामध्ये आज पेट्रोल १०५.१८ रुपये प्रति लिटर दराने विकलं जात आहे.

प्रमुख शहरांतील डिझेलच्या किंमती

दिल्लीमध्ये आज डिझेल ८७.६२ रुपये प्रति लिटर आहे.

कोलकत्तामध्ये आज डिझेल ९०.७६ रुपये प्रति लिटर इतका दर आहे.

चेन्नईमध्ये आज डिझेल ९२.४४ रुपये प्रति लिटर आहे.

तर पटनामध्ये आज डिझेल ९२.०४ रुपये प्रति लिटर दराने विकलं जात आहे.

मुंबई आणि पुण्यातील पेट्रोल डिझेलच्या किंमती

मुंबईत पेट्रोलची किंमत १०४.२१ रुपये प्रति लिटर पेट्रोलचा दर आहे. तर पुण्यात देखील पेट्रोल १०४.२१ रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत डिझेल ९२.१५ रुपये प्रति लिटर आणि पुण्यातही ९२.१५ रुपये प्रति लिटर डिझेलची किंमत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Rule Change: १ जुलैपासून एलपीजीच्या नियमात होणार मोठा बदल, या ग्राहकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Monday Horoscope : वैवाहिक जीवनातल्या अडचणी दूर होणार, ५ राशींची चांदीच चांदी होणार; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेची पूजा नेमकी किती वाजता करावी? जाणून घ्या शुभ-अशुभ वेळ

Maharashtra News Live Update: सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर लासलगावात जोरदार पाऊस

Crime: बायकोचे शेजारच्यासोबत अनैतिक संबंध, बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं

SCROLL FOR NEXT