Petrol Diesel Price Today  Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Prices On 15 July: कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण; 'या' प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त

Petrol and Diesel Rate Today: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी घट झालीये. ब्रेंड क्रूड ऑइल आणि डब्ल्यूटीआय क्रूड ऑइल या दोन्हींचे लाल चिन्हावर व्यवहार सुरू आहेत.

Ruchika Jadhav

Maharashtra Petrol Diesel Prices: देशभरात सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठा बदल दिसून येत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी घट झालीये. (Latest Marathi News)

ब्रेंडक्रूड ऑइलमध्ये १.९१ टक्क्यांची घसरण दिसत आहे. त्यामुळे ब्रेंटक्रूड ऑइलची किंमत ७५.४२ डॉलरवर पोहचली आहे. अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती बदलल्या तरी चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. मात्र आज एका महानगरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल झाला आहे.

या महानगरातील पेट्रोल-डिझेलचे दर घसरले

देशातील मुख्य चार महानगरांमध्ये चेन्नईत पेट्रोल आणि डिझेलचे दर कपात करण्यात आलेत. शनिवारी पेट्रोल ११ पैशांनी आणि डिझेल ९ पैशांनी स्वस्त झाले आहे. अशात आज चेन्नईत पेट्रोल १०२.६३ रुपये आणि ९४.२४ प्रति लिटर डिझेल विकलं जातंय.दिल्लीतील दर कायम आहेत. दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर. कोलकाता येथे पेट्रोल १०६.०३ आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे.

अन्य शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

आग्रामध्ये पेट्रोल ९६.५१ रुपये डिझेल ८९.६७ रुपये प्रति लिटर आहे.

लखनैमध्ये पेट्रोल ९६.४७ रुपये डिझेल ८९.७६ रुपये प्रति लिटर आहे.

गाझियाबादमध्ये पेट्रोल ९६.५८ रुपये डिझेल ९१.५६ रुपये प्रति लिटर आहे.

पटणामध्ये पेट्रोल १०७.२४ रुपये डिझेल ९४.०४ रुपये प्रति लिटर आहे.

तुमच्या शहरातील दर कसे तपासाल ?

दररोज जर तुम्हाला पेट्रोल व डिझेलच्या किंमची तपासायच्या असतील तर तेल कंपन्या एसएमएस सुविधा देतात. HPCL ग्राहक HPPRICE <डीलर कोड> 9222201122 वर, इंडियन ऑइल (Oil) RSP <डीलर कोड> 9224992249 वर आणि BPCL ग्राहक <डीलर कोड> 9223112222 वर एसएमएस करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raw Vs Roasted Pumpkin Seeds: कच्चा की भाजलेल्या, कोणत्या भोपळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर

महापालिकांचे आयुक्त बदलले! IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीएम किसानच्या २४व्या हप्त्याचे २,००० कधी जमा होणार?

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरे गटावर निलेश राणेंची टीका; दोन ठाकरे एकत्र आले तरी राजकीय फरक पडणार नाही

Health Tips : एकाच वेळी अतिप्रमाणात पाणी प्यायलं तर शरीरात नक्की काय घडतं? आरोग्यासाठी चांगलं की वाईट?

SCROLL FOR NEXT