Petrol Diesel Price: आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीत सतत चढउतार होत आहेत. दररोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्या कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर करतात. राज्यस्तरावर आकारण्यात येणाऱ्या करामुळे शहरांमधील पेट्रोल-डिझेलच्या किंमती बदलत जातात. शनिवारी WTI क्रूड ०.३७ डॉलर प्रति बॅरलने विकलं जात आहे. तर ब्रेंट क्रूड ०.४१ ने वाढून प्रति बॅरल ८६.८१ वर पोहचले आहे. (Latest Marathi News)
आज अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर याचा ताण येतोय. गुजरातमध्ये आज पेट्रोल आणि डिझेल २१ आणि २० पैशांनी महागले आहे. राजस्थानात पेट्रोल ३८ पैशांनी महागलं आहे. तर डिझेल ३४ पैशांनी महागलं आहे. यासह तामिळनाडूमध्ये देखील पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांकी गाठलीये. हिमाचल प्रदेशात पेट्रोल ३४ पैसे आणि डिझेल ३२ पैशांनी स्वस्त झालं आहे. तसेच महाराष्ट्रात पेट्रोल ३१ पैसे आणि डिझेल २९ पैशांनी स्वस्त झालंय.
चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर किती?
दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटरवर पोहचलं आहे.
मुंबईमध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे.
कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटरने विकलं जातंय.
चेन्नईमध्ये पेट्रोल १४२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.३३ रुपये प्रति लिटर आहे.
असे तपासा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर
शहरे आणि राज्यानुसार पेट्रोल-डिझेलच्या किमती निश्चित केल्या जातात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या शहराची नवीनतम किंमत जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही एसएमएसद्वारेच तपासू शकता. जर तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी RSP<deलर कोड> लिहा आणि ९२२४९९२२४९ वर मेसेज पाठवा.
तर, BPCL ग्राहकांना डीलर कोड> 9223112222 नंबरवर पाठवावा लागेल आणि HPCL ग्राहकांना HPPRICE <डीलर कोड> 9222201122 क्रमांकावर पाठवावा लागेल. यानंतर, काही मिनिटांत कंपनी तुम्हाला शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर पाठवेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.