Petrol-Diesel Rate Today Saam TV
बिझनेस

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा बदल; तुमच्या शहरातील आजचा भाव काय? जाणून घ्या...

Petrol-Diesel Rate Today: सरकारी तेल कंपन्यांनीही शुक्रवारी सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवी दर जाहीर केले आहेत. त्यानुसार, देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे.

Satish Daud

Petrol-Diesel Maharashtra Rate Today

सरकारी तेल कंपन्यांनीही शुक्रवारी सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवी दर जाहीर केले आहेत. त्यानुसार, देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. तर काही ठिकाणी इंधनाच्या किमतीत नरमाई दिसून आली आहे. गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नव्हता.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अंदाजानुसार, नोएडामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल (Petrol-Diesel Price Today)  स्वस्त झालं आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ५ पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ६ पैशांची घसरण झाली आहे. त्यामुळे नोयडात पेट्रोल-डिझेलची किमत अनुक्रमे ९६.५९ आणि ८९.७६ रुपये इतकी आहे.

गाझियाबाद जिल्ह्यातही पेट्रोल १४ पैशांनी स्वस्त होऊन ९६.४४ रुपये प्रति लिटर इतके झाले आहे. तर डिझेल १३ पैशांनी घसरून ८९.६२ रुपये प्रति लिटर झाले आहे. बिहारची राजधानी पाटनामध्ये आज पेट्रोल २९ पैशांनी महाग झाले असून ते १०७.५९ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. (Latest Marathi News)

तर डिझेल २७ पैशांच्या वाढीसह ९४.३६ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोलचे भाव प्रतिलिटर १०६.३१ रुपये, तर डिझेलचा दर प्रतिलिटर ९४.२७ रुपये इतका आहे.

राज्यातील पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव

  • मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रतिलिटर, तर डिझेल ९४.२७ रुपये प्रतिलिटर दराने विकलं जातंय.

  • पुण्यामध्ये पेट्रोलचा भाव १०५.८४ रुपये प्रतिलिटर, तर डिझेलचा भाव ९२.७१ प्रतिलिटर इतका आहे.

  • नाशिकमध्ये पेट्रोल प्रतिलिटर १०६.१८ रुपये, तर डिझेल प्रतिलिटर ९२.४१ रुपयांनी विकलं जात आहे.

  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलिटर १०६.०४ रुपये, तर डिझेल प्रतिलिटर ९२.६३ रुपये दराने विकलं जातंय.

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०७.२१ रुपये इतके आहे, तर डिझेलचा भाव प्रतिलिटर ९३.५७ रुपये इतका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT