Petrol-Diesel Maharashtra Rate Today Saam TV
बिझनेस

Petrol-Diesel Price: महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; मुंबई-पुण्यात आजचा भाव काय?

Petrol-Diesel Rate Today: गेल्या महिन्याच्या अखेरच्या तारखेला महाराष्ट्रात पेट्रोलची सरासरी किंमत १०७.०८ रुपये प्रति लिटर होती. ज्याच्या तुलनेत किंमती आता ०.१९ टक्के कमी झाल्या आहेत.

Satish Daud

Petrol-Diesel Maharashtra Rate Today

इंधनाचे दर कच्चा तेलाच्या किमतीवर आधारभूत असतात. मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत चढ-उतार होत आहे. क्रूड ऑईलची किंमत प्रतिडॉलर १०० रुपयांवर ८५ डॉलर्सच्या आसपास आली आहे. त्यामुळे लवकरच पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आठवड्याच्या सुरुवातीलाच कच्चा तेलाच्या किमतीत पुन्हा घसरण झाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कच्चा तेलाच्या किमती कमी होताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel Price) नवे दर जारी केले आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या वेबसाइट iocl.com नुसार, मुंबई ते दिल्लीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

महाराष्ट्रात आज पेट्रोलची सरासरी किंमत १०६.८९ रुपये प्रति लिटर इतकी आहे. गेल्या महिन्याच्या अखेरच्या तारखेला महाराष्ट्रात पेट्रोलची सरासरी किंमत १०७.०८ रुपये प्रति लिटर होती. ज्याच्या तुलनेत किंमती आता ०.१९ टक्के कमी झाल्या आहेत. (Latest Marathi News)

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा भाव काय?

  • मुंबईमध्ये पेट्रोलचे दर १०६.३१ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर हे ९४.२७ रुपये प्रति लिटर आहेत.

  • पुण्यामध्ये पेट्रोलच्या किंमती १०५.८४ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९२.७१ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.

  • नाशिकमध्ये पेट्रोल १०६.१८ रुपये प्रति लिटरने विक्री होतंय. तर डिझेल ९२.४१ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०६.०४ रुपये आणि डिझेलची किंमत ९२.६३ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०७.२१ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९३.५७ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

  • अहमदनगरात पेट्रोलच्या किंमती या १०५.९६ रुपये प्रति लिटर अशा आहेत. डिझेलच्या किंमती ९३.४१ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : अपघाताचा थरार! म्हशीला वाचवताना ५ वाहनांची जोरदार टक्कर, ४ जणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावर मृतदेहाचा खच

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणणाऱ्या भोंदू बाबाकडून कोट्यवधींची फसवणूक|VIDEO

Vanjari Community: महाराष्ट्रभर वंजारी समाजाचे ST प्रवर्गातील आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

Nashik Crime: फिरण्याच्या बहाण्यानं मुंबईत आणलं; बाथरुममधील तिचे फोटो काढले,नंतर...

School Firing : शाळेत अंदाधुंद गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT