One Plus Smartphone Saam Tv
बिझनेस

Smartphone: 50MP कॅमेरा अन् जबरदस्त बॅटरीसह OnePlus Nord N30 SE 5G लाँच; जाणून घ्या सविस्तर

One Plus Smartphone: स्मार्टफोनमध्ये वन प्लस ही नावाजलेली कंपनी आहे. कंपनीने नुकताच OnePlus Nord N30 SE 5G फोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन N20 SE चा अपग्रेड व्हर्जन आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

OnePlus Nord N30 SE 5G Price Feature And Specification:

स्मार्टफोनमध्ये वन प्लस ही नावाजलेली कंपनी आहे. कंपनीने नुकताच OnePlus Nord N30 SE 5G फोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन N20 SE चा अपग्रेड व्हर्जन आहे.

कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये 6.72 इंचचा LCD डिस्प्ले आणि 50MP चा प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे. या नवीन स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊया. (Latest News)

किंमत

OnePlus Nord N30 SE 5G स्मार्टफोनची विक्री अजून सुरु झाली नाहीये. कंपनीने भारतात अजून स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल कोणताही खुलासा केलेला नाहीये. स्मार्टफोन लवकरच ऑफलाइन आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे.

फिचर्स

OnePlus Nord N30 SE 5G स्मार्टफोनला कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहे. OnePlus Nord N30 SE 5G या स्मार्टफोनमध्ये 6.72 इंचाचा पंच होल कटआउट LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात FHD+ रिझोल्यूशन आहे. फोनच्या मागील भागात आयताकृती आकारात कॅमेरा आयलँड देण्यात आला आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित OxygenOS 13.1 सह येतो.

स्मार्टफोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 2MP डेप्थ लेन्स देण्यात आला आहे. तर 8MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन MediaTekDimension6020 प्रोसेसरसह येतो. यात 4GB रॅम आणि 128GB इनबिल्ड स्टोरेज देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack risk: दररोजच्या या ५ सवयी तुमच्या हृदयाला पाडतायत आजारी; डॉक्टरांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Maharashtra Live News Update : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णविराम?

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

SCROLL FOR NEXT