Nothing Phone 3a GOOGLE
बिझनेस

Nothing Phone 3a विक्रीसाठी उपलब्ध, ५ हजार रुपयांपर्यंत बचत मिळवण्याची सुवर्णसंधी

आज Nothing Phone 3a चा पहिला सेल फ्लिपकार्टवर सुरू झाला आहे, ज्यात ५ हजार रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी आहे. या हँडसेटचे स्पेसिफिकेशन्स आणि कॅमेरा सेटअप कसे आहेत?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नथिंगने फोनने गेल्या आठवड्यात भारतात त्यांच्या नवीन Nothing Phone ३a फोनची घोषणा केली आणि आज त्याची पहिली विक्री होणार आहे. हा सेल फ्लिपकार्टवर दुपारी १२ वाजल्यापासून सुरू झाली. या विक्रीमध्ये वापरकर्त्यांना ५,००० रुपये वाचवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. वापरकर्त्यांसाठी हा सेल आकर्षक ऑफर घेऊन येत आहे.

नथिंग फोन ३ए मालिकेत दोन हँडसेट्स, नथिंग फोन ३ए आणि नथिंग फोन ३ए प्रो लाँच करण्यात आले आहेत. दोन्ही हँडसेटमधील मुख्य फरक कॅमेरा सेटअपमध्ये आहे. फ्लिपकार्टवर नथिंग फोन ३ए चा सेल सुरू आहे. या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफर्स आणि तंत्रज्ञानाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया, जे यूजर्सना आकर्षित करणार आहे.

फ्लिपकार्टवरील माहितीप्रमाणे, नथिंग फोन ३ए हँडसेट १९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे, जे २४,९९९ रुपयांच्या लाँच किमतीपेक्षा ५,००० रुपयांनी कमी आहे. या हँडसेटच्या बेस व्हेरिएंटमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिलं जातं. यूजर्सना आकर्षक ऑफर आणि कमी किमतीत उत्कृष्ट स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळते आहे.

Nothing Phone 3A मध्ये ६.७७-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो १२०Hz रिफ्रेश रेट आणि ३००० निट्स ब्राइटनेस प्रदान करतो. हँडसेटमध्ये १०००Hz टच सॅम्पलिंग रेट आणि ५०००mAh बॅटरी आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन ७s Gen ३ प्रोसेसर आणि Nothing OS ३.१ आधारित Android १५ कार्यरत आहे. त्यात नथिंगची सिग्नेचर लाइटिंग फीचर देखील दिलं गेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT