Amravati Flight Fare saam tv
बिझनेस

Mumbai-Amravati Flight: मुंबई-अमरावती प्रवासाचे १० तास वाचणार, विमानाचे तिकीट दर किती? जाणून घ्या वेळापत्रक

Mumbai-Amravati Flight Fare: १४ वर्षानंतर आज अखेर अमरावतीकरांचं स्वप्न पूर्ण झाले. मुंबईवरून पहिलं विमान अमरावती विमानतळावर लँड झाले. मुंबई ते अमरावती विमान प्रवासासाठी किती तिकीट लागेल हे जाणून घेऊ.

Bharat Jadhav

Mumbai-Amravati Flight Ticket Price: खूशखबर, खूशखबर ! अमरावतीकर आता हवाई प्रवासांचा आनंद घेऊ शकणार आहेत. मुंबई ते अमरावती प्रवास विमानाने करता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अमरावती विमानतळाचे उद्धघाटन झालं. अमरावतीमधील विमानतळ सुरू झाल्याने अनेकांना हवाई प्रवासासाठी किती वेळ लागले, किती तिकीट लागेल असा प्रश्न पडलेत. तर अमरावतीकरांनो ! काळजी नको, आज आपण अमरावती ते मुंबईच्या प्रवासाचं तिकीट दर किती हे जाणून घेऊ.

आजपासून अमरावती ते मुंबई आणि मुंबई ते अमरावती विमान वाहतूक सेवा सुरू झालीय. पहिल्याच दिवशी विमानाचे बुकिंग हाऊसफूल झालं होतं. गेल्या अनेक वर्षापासून बहुप्रतीक्षित असलेल्या अमरावती विमानतळाचा आज लोकार्पण सोहळा पार पडला झाला. १४ वर्षानंतर आज अमरावतीकरांचं स्वप्न पूर्ण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार,एकनाथ शिंदे, केंद्रीय उड्डाण मंत्री कीजरापू राम मोहन नायडू यांच्या हस्ते विमानतळाचं लोकार्पण झालं.

या विमानतळामुळे अमरावतीच्या विकासाला चालना मिळेल. दरम्यान, ७२ आसनी विमान अमरावती ते मुंबई व मुंबई ते अमरावती असे आठवड्यातून तीन वेळा उड्डाण घेणार आहे. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी आठवड्यातून विमानसेवा चालू राहणार आहे.

मुंबईवरून पहिलं विमान अमरावती विमानतळावर सुरक्षित लँड झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नवनीत राणा यासह इतर मंत्र्यानी पहिल्या विमानाने प्रवास केला.

रेल्वेपेक्षा विमानाचं तिकीट स्वस्त

अमरवाती ते मुंबईचं विमानाचे तिकीट हे दुरांतो एक्स्प्रेसच्या तिकीटापेक्षा स्वस्त आहे. अमरावती आणि मुंबई दरम्यानच्या विमानसेवेमुळे प्रवासाचा वेळ देखील वाचणार आहे. मुंबई ते अमरावती प्रवासासाठी दुरांतो एक्स्प्रेसचं तिकीट २७५० रुपये आहे. तर विमानाचे २५०० रुपये असणार आहे. तिकीटाचे दर २५०० ते ३५०० रुपयांपर्यंत असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बदलापूर स्त्री बीज प्रकरणातील सहावा डॉक्टर आरोपी अटक

Chhatrapati Shivaji Maharaj fort: समुद्रासमोर सिंधुदुर्ग किल्ला ताठ उभा राहण्यासाठी छत्रपती शिवरायांनी कोणती युगत मांडली?

मालेगाव महापालिकेच्या महासभेत राडा; MIM आणि सत्ताधारी नगरसेवकांमध्ये हमरीतुमरी, एकमेकांच्या अंगावर आले धावून|VIDEO

Iran-Israel War: इस्राइलच्या हल्ल्यात इराणच्या नव्या संरक्षणमंत्र्याचा मृत्यू, ४८ तासांपूर्वी स्वीकारला होता पदभार

प्रेमाचा रक्तरंजित शेवट; होळीच्या दिवशी नवऱ्याने बॉयफ्रेंडसोबत राहणाऱ्या बायकोला क्रूरपणे संपवलं

SCROLL FOR NEXT