SIM Card Rules : एकापेक्षा जास्त SIM वापरताय? तर थांबा... दूरसंचार विभागाने जारी केले नवे नियम meta ai
बिझनेस

SIM Card Rules : एकापेक्षा जास्त SIM वापरताय? तर थांबा... दूरसंचार विभागाने जारी केले नवे नियम

Mobile Simcard Updates : एकापेक्षा जास्त SIM कार्ड वापरत असाल तर तुमच्या नावावर किती मोबाईल नंबर नोंदणीकृत आहेत, हे तपासणे आता महत्त्वाचे आहे. ९ पेक्षा जास्त SIM कार्ड असलेल्या ग्राहकांना १० वे सिम कार्ड मिळणार नाही. नियमामुळे नवीन SIM घेण्यापूर्वी ही माहिती जाणून घ्या.

Saam Tv

सध्याच्या डिजीटल युगात प्रत्येकाकडेच स्मार्ट फोन असतो. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांकडेच मोबाईल असतो. त्यामुळे प्रत्येकाकडेच सिम कार्ड असतं. बऱ्याचदा पालक किंवा कुटुंबातली प्रमुख व्यक्ती तिच्या नावावर सिम कार्ड काढून देते. काहींना व्यवसायासाठीही जास्त सिम कार्ड वापरावे लागत असतील. पण याच संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आता एका पेक्षा जास्त सिम कार्ड कोणालाही वापरता येणार नाहीत. कारण सरकार आणि दूरसंचार विभागाने (DOT) सिमकार्डाबाबत नवा नियम लागू आहे. तसेच एका पेक्षा जास्त सिम कार्ड वापरण्यावर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

ज्या ग्राहकांच्या नावावर ९ पेक्षा जास्त सिम कार्ड नोंदवले गेले असतील त्यांना १० वे सिम कार्ड मिळू शकणार नाहीत. २४ ऑगस्ट पासून हा नियम देशभरात लागू करण्यात येणार आहे. याआधी हा नियम लागू करण्यात आला होता मात्र याचे पालन काटेकोरपणे केले जात नव्हते. या संधीचा गुन्हेगारांना फायदा होत होता. बाजारात अनेक सिम कार्ड सहज उपलब्ध होत असल्याने एका नावावर अनेक सिम कार्ड खरेदी करणं शक्य होतं. चोरांना शोधण्यासाठी पोलिसांना सर्वात प्रथम येणारी ही तांत्रिक अडचण होती. पण दूरसंचार विभागाने लागू केलेल्या या नव्या नियमामुळे गुन्हेगारीला आळा बसणार आहे.

दूरसंचार विभागाने ९ ऑगस्ट रोजी हे परिपत्रक जारी केले. परिपत्रकानुसार जर एखाद्या व्यक्तिच्या नावावर ९ पेक्षा जास्त सिम कार्डांची नोंद असेल तर ती सिम कार्ड ब्लॉक करण्यात येणार आहेत. हा नियम कोणत्याही एका कंपनीच्या सिमला नाही तर सर्व मोबाईल कंपन्याना लागू करण्यात आला आहे. समजा तुमच्याकडे ३ एअरटेल सिम, ४ जिओ सिम,२ व्हिआयचे असे एकूण ९ सिम असतील तरीही तुम्हाला कोणत्याही कंपनीचे १० वे सिम घेऊ शकत नाहीत.

24 ऑगस्ट पासून नवे सिम कार्ड खरेदी करण्यापूर्वी अर्जदाराच्या नावावर असलेल्या मोबाईलची तपासणी केली जाणार आहे. सर्व मोबाईल कंपन्यासाठी हा नियम कठोर करण्यात आला आहे. याव्यतिरित्त नवीन सिम खरेदी करताना ग्राहकाला फॉर्ममध्ये याआधी नावावर नोंदणी असलेल्या मोबाईल क्रमांकाची किंवा सिम कार्ड ची संख्या नमूद करावी लागणार आह. मग ती कंपनी कोणतीही असो.

या लागू करण्यात आलेल्या कडक नियमामुळे सायबर फसवणूक, आर्थिक घोटाळे आणि इतर बेकायदेशीर कृत्यांना वचक बसणार आहे. ग्राहकांनी या सुविधेचा कोणताही गैरफायदा न घेता योग्य वापर करावा. अशी स्पष्ट सूचना दूरसंचार विभागाने दिली आहे.

तुमच्या नावावर किती सिम आहेत? त्याचा तपास असा करा

तुमच्या नावावर किती सिम कार्ड रजिस्टर आहेत हे तुम्ही तपासू शकता. सरकारच्या संचार साथी या पोर्टलवर तुमचा मोबाईल नंबर टाकून, तुमच्या नावावर किती नंबर नोंदवले गेले आहेत ते तपासू शकत. एखादा अनोळखी नंबर दिसत असल्यास तक्रार देखील नोंदवू शकता.

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्ग अपघात प्रकरण , गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी घेतली जखमीची भेट

Fatty liver symptoms: चेहऱ्यावर ही 6 लक्षणं दिसून आली तर समजा लिव्हर लवकरच होणारे खराब, दुर्लक्ष करणं पडेल महागात

Diveagar Accident: सहलीला मजा करायला गेलो अन् ..., दिवेआगर येथे विद्यार्थ्यांचा मृत्यू कसा झाला? मित्रांनी सांगितला थरारक अनुभव

LPG Cylinder Price : LPG सिलेंडरच्या दरात मोठा बदल! 2 ऑक्टोबरला किती रुपयांना मिळतोय गॅस? जाणून घ्या नवीन दर

Sleep Duration by Age: ६ तास झोप पुरेशी आहे का? नवजात बालक ते वृद्धांपर्यंत; वयानुसार किती झोप आवश्यक

SCROLL FOR NEXT