Instagram users react to Meta’s latest privacy policy update that raises concerns about the future of end-to-end encryption in direct messages. Saam Tv
बिझनेस

मेटाचा युजर्सना मोठा झटका, 8 मे नंतर 'DM' मध्ये 'नो' प्रायव्हसी?

Meta Privacy Shock: तुमचे वॉट्सअप आणि इंन्स्टाचे खासगी मेसेज आता खासगी राहणार नाहीयेत. होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलंयत. . मेटाने खरचं एंड-टू-एंड एन्क्रिप्शन बंद केलयं का? इंन्स्टाग्राम युजर्सची धडधड का वाढली? सविस्तर पाहा या स्पेशल रिपोर्टमधून

Saam Tv

इतके दिवस तुमच्या इन्स्टाग्रामवर जे 'लॉकर'चं चिन्ह दिसायचं ना, ते म्हणजे तुमच्या खाजगी आयुष्याचं कवच होतं! जे कवच आता गळून पडणार आहे.. कारण मेटाने इन्स्टाग्रामवरचं एंड-टू-एंड एन्क्रिप्शन बंद करणार आहे... ही बातमी ऐकून कदाचित तुम्हालाही धक्का बसेल. समजा मेटानं हे एन्क्रिप्शन खरोखरच बंद केले, तर तुमचे मेसेज एखाद्या 'खुली किताब'सारखे होतील. मार्क दादांनी जर या कड्या काढून घेतल्या, तर समजून जा की तुमच्या मोबाईलच्या पडद्यामागे आता तिसऱ्या डोळ्याची एन्ट्री झालीय

साधारणपणे दिवसातल्या २४ तासापैकी १५ते १६ तास मोबाईल सुरू असतो. त्यातला सर्वाधिक जास्त वेळ हा सोशल मीडियावर जातो. हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरताना सर्वात महत्त्वाची असते प्रायव्हसी. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन नेमकं काय होतं... पाहूयात..

इंस्टग्रामने डिसेंबर 2023 मध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन फीचर्स आणले होतं. जेणेकरून युजर्सचे खाजगी चॅट पूर्णपणे सुरक्षित राहतील. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन या फीचरमुळे दोन व्यक्तींमधील संभाषण तिसऱ्या व्यक्ती वाचू शकत नाही. युजर्सचीही तीच अपेक्षा असते.मात्र आता मेटानं ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून 8 मे 2026 पासून Instagram वर पाठवलेले मेसेज पूर्वीसारखे पूर्णपणे खासगी नसतील, असं सांगितलयं... मात्र कंपनीच्या प्रायव्हसी पॉलिसीमधल्या बदलामळे युजर्सच्या चॅटिंगबाबत नवी चर्चा रंगलीय...आता याचा फटका इंस्टाग्राम युजर्सना बसणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. थोडक्यात सांगायचं तर, तुमच्या इन्स्टाच्या 'खिडक्या' आता उघड्या झाल्या आहेत, आणि बाहेरून कुणीतरी तुमच्या पर्सनल आयुष्यात डोकावून पाहणार आहे.. युजर्समध्ये आता एकच चर्चा आहे की "आता गुपितं नेमकी सांगायची कुठे?"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajya Sabha Election: काँग्रेसच्या ३ आमदारांवर होणार कारवाई; राजकीय वर्तुळात खळबळ, काय आहे कारण?

Tuesday Horoscope : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल; ५ राशींच्या लोकांचा वाढणार मानसिक ताण

आयसीयूत रुग्णाला उंदरानं कुरतडलं? भाईंदरमध्ये आरोग्यव्यवस्था पोखरलेली

Maharashtra Live News Update: दानवाड संगमावर ३०० वर्षांपूर्वीचा पुरातन घाट सापडला

युद्धात अमेरिका एकटी पडली? ऐन युद्धात ट्रम्पना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT