Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: MBBS केलं, १२ तासांची शिफ्ट करत UPSC चा अभ्यास, दुसऱ्या प्रयत्नात यश; IAS अंजली गर्ग यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of IAS Anjali Garg: आयएएस अंजली गर्ग यांनी एमबीबीएस करताना यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केला. त्यांनी १२ तासांची नोकरी करत असताना स्पर्धा परीक्षा क्रॅक केली आहे.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा देऊन अनेकांना आयएएस, आयपीएस व्हाचे असते. आयएएस किंवा आयपीएस ही एक पोस्ट नसून अनेकांचे स्वप्न असते. यासाठी तरुण दिवसरात्र मेहनत करतात. असंच काहीसं अंजली गर्ग यांनी केलं. त्यांनी एमबीबीएसचा अभ्यास करता करता यूपीएससी (UPSC) परीक्षेचा अभ्यास केला. त्यांनी दोन्ही परीक्षांमध्ये यश मिळवलं आहे.

डॉ. अंजली गर्ग या आयएएस (IAS Anjali Garg) आहेत. त्यांनी आयुष्यात सर्वकाही व्यवस्थित सुरु असतानाही स्वप्नांचा पाठलाग केला. डॉक्टरचा अभ्यास करता करता त्यांनी यूपीएससी परीक्षेचाही अभ्यास केला. त्यांना या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

अंजली गर्ग यांचा जन्म १४ सप्टेंबर १९९६ रोजी चंदीगढ येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच डॉक्टर व्हायचे होते. त्यांचे वडील बिझनेसमॅन आहेत. त्यांच्या घरात सिविल सर्व्हिसमध्ये कोणीच रुजू नाही. परंतु अंजली यांनी प्रशासकीय सेवेत काम करण्याचा निर्णय घेतला. अंजली यांनी सुरुवातीचे शिक्षण चंदीगढमधून घेतले. (Success Story of IAS Anjali Garg)

अंजली यांना १२वीत ९६ टक्के मिळाले होते. यानंतर त्यांनी नीट परीक्षा क्रॅक केली. त्यानंतर दिल्लीतून त्यांनी एमबीबीएस केले. एमबीबीएस करताना तिसऱ्या वर्षी त्यांचा विचार बदलला. मेडिकल क्षेत्रातील कमतरतेबद्दल त्यांना जाणीव झाली. ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी प्रशासकीय सेवेत काम करण्याचा निर्णय घेतला.

अंजली यांनी कोविडच्या काळात सर्वात आधी यूपीएससी परीक्षा दिली. यात त्यांना अपयश मिळाले. परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी २०२२ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात ७९ रँक प्राप्त केली. त्या आयएएस म्हणून कार्यरत आहेत.यूपीएससी परीक्षेची तयारी करत असताना त्यांनी मेडिकल इंटर्नशिप सुरु ठेवली. त्या दिवसभर हॉस्पिलमध्ये काम करायच्या. त्यानंतर कोचिंग क्लासेस आणि सेल्फ स्टडी केली. त्यांनी १२ तास नोकरी केली. त्यानंतर त्यांनी अभ्यास केला अन् यूपीएससी (UPSC) परीक्षा क्रॅक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

SCROLL FOR NEXT