Maruti Suzuki EVx Saam Tv
बिझनेस

Maruti Suzuki लॉन्च करणार सर्वात स्वस्त 7 सीटर कार, EV सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच घेणार एन्ट्री; जाणून घ्या किंमत

Satish Kengar

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी लवकरच आपली जबरदस्त कार लॉन्च करणार आहे. कंपनी पहिल्यांदाच ईव्ही सेगमेंटमध्ये आपलं नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे. मारुती मोठ्या कुटुंबाला लक्षात घेऊन 7 सीटर कारही लॉन्च करणार आहे. जर तुम्ही मारुती सुझुकीच्या नवीन कारची वाट पाहत असाल तर थोडी प्रतीक्षा करा. यातच आज आपण मारुतीच्या अपकमिंग कारबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत...

Maruti Suzuki EVx

मारुती सुझुकी भारतात नवीन EVx सह पहिल्यांदा ईव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही म्हणून सादर करण्यात येणार आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही जानेवारीमध्ये होणाऱ्या भारत मोबिलिटीमध्ये लॉन्च होईल, अशी शक्यता आहे.

याआधी जानेवारी 2023 मध्ये झालेल्या ऑटो एक्सपोमध्ये कंपनीने आपली नवीन कॉन्सेप्ट कारचे मॉडेल प्रदर्शित केलं होतं. विशेष बाब म्हणजे ही एसयूव्ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल. नवीन मारुती ईव्हीएक्स ही 5 सीटर एसयूव्ही असेल जी अनेक ॲडव्हान्स फीचर्ससह येईल.

Maruti Suzuki Grand Vitara 7 Seater

मारुती सुझुकी ग्रँड विटारा आत्तापर्यंत 5 सीटरमध्ये येत आहे. मात्र लवकर याचा 7 सीटर व्हेरियंट पुढील वर्षी लॉन्च होऊ शकतो.

कंपनीने याला Y17 कोड नाव दिले आहे. डिझाईनच्या बाबतीत ही कार ग्रँड विटारा सारखीच असेल. मात्र यात तीन रो सीट्सचा पर्याय दिला जाईल. याची किंमत किती असेल, यात कोणते फीचर्स मिळतील, अशी सगळी माहिती कंपनी लवकरच उघड करू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips : सतत केस गळतायत? आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश; आठवड्यात दिसतील परिणाम

Dasara melava 2024 News : यंदा शिंदे गटाचा दसरा मेळावा कुठे होणार? महत्वाची माहिती आली समोर

Home Remedies: मधमाशी चावल्यानंतर करा 'हे' घरगुती उपाय

WTC Points Table: टीम इंडिया तिसऱ्यांदा WTC फायनल खेळणार? या 2 संघांचे टेन्शन वाढले

Kalyan News : लोकल ट्रेनमध्ये सापडलेल्या २० लाख रकमेचा मालक आला समोर; पोलिसांनी मागविला तपशील

SCROLL FOR NEXT